शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऐन रोगराईत मनपाचे ५० टक्के दवाखाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:12 IST

शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची साथ असताना महापालिकेचे ३० शहरी आरोग्य केंद्र म्हणजेच दवाखान्यांपैकी १५ दवाखाने चक्क बंद आहेत. याशिवाय गंगापूरगाव आणि सिन्नर फाटा रुग्णालय येथे प्रसूतिगृह असतानादेखील ते अनेक वर्षांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

ठळक मुद्देधक्कादायक : दोन रुग्णालयांत प्रसूतीही बंद

नाशिक : शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची साथ असताना महापालिकेचे ३० शहरी आरोग्य केंद्र म्हणजेच दवाखान्यांपैकी १५ दवाखाने चक्क बंद आहेत. याशिवाय गंगापूरगाव आणि सिन्नर फाटा रुग्णालय येथे प्रसूतिगृह असतानादेखील ते अनेक वर्षांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्यानंतर आता रुग्णालये पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.सध्या शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूची साथ सुरू आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या पाचशेच्या पुढे गेली आहे तर दोन जणांचा बळी गेला आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दीडशेच्या आत असली तरी आत्तापर्यंत सात जणांचा बळी गेला आहे. शहरात आजही घरटी रुग्ण आहेत आणि सर्वच दवाखाने, रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी आहे. महापालिकेच्या वतीने त्यांच्या दवाखान्यात म्हणजे शहरी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांच्या आधारेच साप्ताहिक अहवाल लक्षात घेऊन वैद्यकीय विभाग नियोजन करीत असताना दुसरीकडे मूलभूत माहिती देणारी शहरी आरोग्य केंद्रेच बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. बहुतांशी शहरी आरोग्य केंद्रे सामान्य नागरिकांच्या वस्त्यांमध्ये आहेत. तेथील नागरिकांना उपचार तर मिळत नाहीतच शिवाय महापालिकेला शहरात कितपत रोगराई आहे, याबाबत अंदाज घेणेदेखील अडचणीचे झाले आहे. याशिवाय महापालिकेच्या रुग्णालयांपैकी गंगापूर आणि सिन्नर फाटा येथील रुग्णालयात व्यवस्था असूनही, तेथे महिलांची प्रसूती होत नाही. अपुरे डॉक्टर आणि कर्मचारी असे कारण त्यासाठी दिले गेले आहे.रुग्णालये तातडीने सुरू करण्याचे आदेशमहापालिकेची सर्व पंधरा बंद रुग्णालये तातडीने सुरू करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी दिले आहेत. याशिवाय वैद्यकीय विभागासाठी किती डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, याबाबतही स्थायी समितीला माहिती सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल