शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
2
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
3
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
4
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
5
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
6
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
7
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
8
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
9
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
10
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
11
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
12
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
13
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
14
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
15
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
16
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
17
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
18
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
19
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
20
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

५० कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:51 IST

डिझेल दरवाढ, टोल परमिट यांसह विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने गत पाच दिवसांपासून बंद पुकारला आहे़ या आंदोलनात देशातील एक हजार पाचशे मालवाहतूक संघटनांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील वीस हजारांहून अधिक ट्रकमालक सहभागी झाले आहेत़

नाशिक : डिझेल दरवाढ, टोल परमिट यांसह विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने गत पाच दिवसांपासून बंद पुकारला आहे़ या आंदोलनात देशातील एक हजार पाचशे मालवाहतूक संघटनांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील वीस हजारांहून अधिक ट्रकमालक सहभागी झाले आहेत़ यामुळे जिल्ह्यातील सुमारे पन्नास कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश शर्मा यांनी मंगळवारी (दि़२४) ‘लोकमत’शी बोलताना दिली़ दरम्यान, निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स व अवजड वाहतूक सेनेसह विविध संघटनांनी मालवाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनास पाठिंबा दिला आहे़ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेनेही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे़डिझेलच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली वाढ, टोल नाक्यावर ट्रक थांबून राहत असल्याने होणारा डिझेलचा अपव्यय व पैसा टाळण्यासाठी नॅशनल परमिटप्रमाणेच टोल परमिट यांसह विविध मागण्यांसाठी शुक्रवार (दि़२०) पासून देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले़  गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील २० हजारांहून अधिक ट्रकमालकांनी सहभाग घेतला असून, संपामुळे पन्नास कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे़८000 कोटी रुपयांच्या डिझेलचा अपव्ययदेशात ९३ लाख नॅशनल परमिटची वाहने असून १६ कोटी लोकांना याद्वारे रोजगार मिळतो़ मात्र देशभरातील विविध टोल नाक्यांवर टोल भरण्यासाठी ट्रकचालकास थांबावे लागत असल्याने वर्षभरात आठ हजार कोटी रुपयांच्या डिझेलचा अपव्यय होतो़ तसेच टोलच्या अडथळ्यामुळे इच्छित ठिकाणी माल पोहोचविण्यास आठ ते दहा तासांचा विलंब होतो़ सरकारने नॅशनल परमिटप्रमाणेच टोल परमिट दिल्यास टोलच्या रकमेमध्ये २५ टक्के वाढ करण्याची तयारीही मालवाहतूकदार संघटनेने दर्शविली आहे़  दरम्यान, गुरुवारी (दि़२६) सकाळी अकरा वाजता मालवाहतूकदार आडगाव नाक्यावरून मोर्चा काढणार असून, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहेत़सरकारने डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षात आणून त्यावरील अधिभार कमी करावा, देशात सर्व ठिकाणी डिझेलचे दर एकच असावेत़ नॅशनल परमिटसारखेच टोलसाठीही परमिट मिळावे, थर्डपार्टी विम्यामधील वाढ कमी करावी.  ट्रान्सपोर्ट व्यवसायातील टीडीएस आकारणी व ई-वे बिलप्रणालीतून दिलासा मिळावा, अशा विविध मागण्या मालवाहतूकदारांच्या आहेत़ या मागण्या पूर्ण होईलपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मालवाहतूकदार संघटनेचे अंजू सिंगल, संजय राठी, सुभाषचंद्र जांगडा, राजेंद्र फड, अमोल शेळके, लक्ष्मण सिरसाठ, सुनील हिरे, सुनील बुरड, जे़ पी़ जाधव़ शरद बोरसे, ज्ञानेश्वर वर्पे, महावीरप्रसाद मित्तल यांनी केला आहे़

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक