शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक, अहमदनगर उपकेंद्रांसाठी ५० कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:53 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर उपकेंद्रला प्रशासकीय मंजूरी द्यावी, तसेच उपकेंद्रांच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी, यासाठी विद्यापीठाचो सिनेट सदस्य अमित पाटील व आमदार अनिल कदम यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन त्यांना उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधीच्या मागणीचे निवेदन दिले.

ठळक मुद्देनाशिक अहमदनगर उपकेंद्रासाठी पन्नास कोटींची मागणी अनिल कदम, अमित पाटील यांनी घेतली तावडेंची भेट

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यानाशिक व अहमदनगर उपकेंद्रला प्रशासकीय मंजूरी द्यावी, तसेच उपकेंद्रांच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी, यासाठी विद्यापीठाचो सिनेट सदस्य अमित पाटील व आमदार अनिल कदम यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन त्यांना उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधीच्या मागणीचे निवेदन दिले. तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयातही देण्यात आले. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे तर नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र लातूर येथे आहे. त्याच धर्तीवर नाशिक व अहमदनगर या  उपकेंद्रांच्या  सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. यापूर्वी अमित पाटील यांनी राज्यपाल व शिक्षणराज्य मंत्री तसेच विद्यापीठाटे  कुलगुरू यांनाही निवेदन दिले होते. नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ उपकेंद्राचे सक्षमीकरण होणे गरजचे अशल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. जिल्हातील कृषिक्षेत्रामधे द्राक्षे व कांदा यांच्याशी निगडीत मोठे व्यापार केले जातात . विद्यापीठाचे उपकेंद्र नाशिकमध्ये आल्यास वायनरी अभ्यासक्र म तसेच अन्नधान्य प्रक्रि या उद्योग अभ्यासक्र म, पर्यटन अभ्यासक्र म,आयात - निर्यात संदर्भात अभ्यासक्र म व नाशिक जिल्ह्यातील विविध मोठे कारखाने यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासक्र म सुरू केले जाऊ शकतात, असे झाल्यास जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊन व्यवसाय करण्याची संधीही उपलब्ध होणे शक्य असल्याने नाशिकचे उपकेंद्र लवक रात लवकर उभे राहावे यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. 

पहिल्या टप्प्यात किमान दहा कोटी मिळावेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी ६३ एकर जागा नाशिकमधे आरक्षित करण्यात आलेली असून केवळ निधी होऊ न शकल्याने बांधकाम सुरू होऊ शकलेले नाही. निधी उपलब्ध झाल्यास या जागेवर बांधकाम सुरू होऊ शकणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात किमान १० कोटी रु पयांचा तरी निधी देऊन या कामाला सुरु वात करावी, अशी मागणी आमदार अनिल कदम व सिनेट सदस्य अमित पाटील यांनी विनोद तावडे यांनी केली.  

टॅग्स :universityविद्यापीठNashikनाशिकStudentविद्यार्थीAnil Kadamअनिल कदम