शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

५० बसेस रस्त्यावर : ‘चौधरी यात्रा’कडून संपकाळात एसटी भाड्याच्या निम्म्यापेक्षाही कमी दरात प्रवाशांना सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 19:55 IST

शहरातील चौधरी यात्रा कंपनीच्या खासगी ५० बसेसद्वारे ‘आपत्कालीन सेवा’ पुरविण्यात आली. एसटीच्या दरापेक्षाही निम्म्या दरात प्रवासी वाहतूक जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर सुरू केल्याची माहिती कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्दे पुणे, औरंगाबाद, धुळे, सटाणा, नंदुरबार, जळगाव आदी शहरांसाठी ठक्कर बाजार येथून खासगी बससेवा उपलब्ध सारापर्यंत ५० रुपये प्रतिप्रवासीनुसार बससेवा असून, त्र्यंबकेश्वर, दिंडोरीसाठी मोफत सेवा शासनाने राज्यातील सर्व खासगी संस्थांच्या मालकीच्या बसेसला प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे.चौधरी यांनी एसटीच्या दरपत्रकापेक्षा निम्म्या दरात नागरिकांना सणासुदीच्या काळात वाहतूक सेवा पुरविण्याची तयारी दर्शवित ठक्कर बाजार येथून बससेवा दुपारी सुरू केली

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे नागरिकांचे हाल होऊ नये व काही प्रमाणात गैरसोय कमी व्हावी, या उद्देशाने प्रादेशिक परिवहन विभाग व एसटी महामंडळाने शासनाच्या आदेशानुसार खासगी वाहतूकदारांची मदत घेण्याचा निर्णय मंगळवारी (दि. १७) दुपारी घेतला. यानुसार शहरातील चौधरी यात्रा कंपनीच्या खासगी ५० बसेसद्वारे ‘आपत्कालीन सेवा’ पुरविण्यात आली. एसटीच्या दरापेक्षाही निम्म्या दरात प्रवासी वाहतूक जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर सुरू केल्याची माहिती कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी दिली.दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचारी राज्यव्यापी संपावर गेल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे महामंडळाच्या कारभारासह सरकारच्या भूमिकेविरुद्धही तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांची गैरसोय काही प्रमाणात कमी होण्यासाठी खासगी वाहतूकदारांची मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने पुढाकार घेतला.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी चौधरी यांच्याशी संपर्क साधून प्रवासी वाहतूक करण्यास सांगितले. दरम्यान, चौधरी यांनी एसटीच्या दरपत्रकापेक्षा निम्म्या दरात नागरिकांना सणासुदीच्या काळात वाहतूक सेवा पुरविण्याची तयारी दर्शवित ठक्कर बाजार येथून बससेवा दुपारी सुरू केली. पुणे, औरंगाबाद, धुळे, सटाणा, नंदुरबार, जळगाव आदी शहरांसाठी ठक्कर बाजार येथून खासगी बससेवा उपलब्ध आहे. मंगळवारी त्र्यंबकेश्वरसाठी पाच बसेसद्वारे मोफत सेवा देण्यात आली.खासगी वाहतुकीबाबत शासनाची अधिसूचनागृहमंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवासी वाहतुकीसाठी मोटार वाहन अधिनियमानुसार शासनाने राज्यातील सर्व खासगी संस्थांच्या मालकीच्या बसेसला प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये खासगी ट्रॅव्हल्स, स्कूल-कॉलेजच्या बसेस, विविध कंपन्यांच्या बसेस व मालवाहू वाहनांनाही प्रवासी वाहतूक करता येणार असल्याचे अधिसूचनेत शासनाच्या कार्यासन अधिकारी नि. ज्यो. घिरटकर यांनी म्हटले आहे.

नफेखोरी उद्देश नव्हे तर माणुसकीसाठी सेवासंप नागरिकांसाठी अडचणींचा असतो. सनदशीर मार्गाने संप करणे हा कामगारांचा हक्क आहे; मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी दराच्या निम्म्यापेक्षाही कमी दरात आमची कंपनी प्रवाशांना सेवा देण्यासाठी पुढे आली. यामागे नफेखोरीचा उद्देश नसून केवळ माणुसकी म्हणून आम्ही बससेवा उपलब्ध करून दिली आहे. संपकाळात बससेवा पुरविली जाणार असून, रात्रीदेखील बसेस ठक्कर बाजार येथून उपलब्ध असणार आहेत. कसारापर्यंत ५० रुपये प्रतिप्रवासीनुसार बससेवा असून, त्र्यंबकेश्वर, दिंडोरीसाठी मोफत सेवा पुरविली जाईल.- ब्रिजमोहन चौधरी, संचालक

टॅग्स :Travelप्रवासStrikeसंप