शहरं
Join us  
Trending Stories
1
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
2
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
3
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
4
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
5
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
6
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
7
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
8
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
9
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
10
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
11
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
12
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
13
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
14
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
15
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
16
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
17
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
18
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
19
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
20
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

१२ फेऱ्यांनंतरही ५ हजार ७६९ जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 11:59 PM

नाशिक : शहरातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित, दोन विशेष आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य नियमाने तब्बल सात फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असली तरी अजूनही सुमारे ५ हजार ७६९ जागा रिक्तच राहिल्या आहेत.

ठळक मुद्देअकरावी प्रवेश : १९ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी केली प्रक्रिया पूर्ण

नाशिक : शहरातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित, दोन विशेष आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य नियमाने तब्बल सात फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असली तरी अजूनही सुमारे ५ हजार ७६९ जागा रिक्तच राहिल्या आहेत.अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या एकूण ३२ हजार ५७ विद्यार्थ्यांपैकी १९ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत तब्बल १२ फेऱ्या घेण्यात आल्या. तरीही सुमारे ५ हजारहून अधिक जागा रिक्त राहिल्यने या प्रक्रियेवर कोरोनाचा प्रभाव झाल्याचे दिसून आले. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत ३२ हजार ५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर २६ हजार ८०४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरला होता. यात भाग दोन भरताना आणखी विद्यार्थ्यांची गळती होऊन २४ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जाचा भाग दोन भरून त्याची पडताळणी करून घेतल्याने ते प्रवेशासाठी पात्र ठरले होते. यातील केवळ १९ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तर ५ हजार ७६९ जागा रिक्त राहिल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय