शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

५५ किलो अफूचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:23 IST

नाशिक : विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी ग्रामीण पोलीसदेखील सतर्क झाले असून, जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या सुमारे ...

ठळक मुद्देग्रामीण पोलिसांची कारवाई : २७४ अवैध धंद्यांवर धाडी; २४ लाखांचे मद्य हस्तगत

नाशिक : विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी ग्रामीण पोलीसदेखील सतर्क झाले असून, जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या सुमारे २७४ अवैध धंद्यांवर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये सुमारे २४ लाख १३ हजार रुपयांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला, तसेच मालेगाव तालुक्यातील नाकाबंदीदरम्यान ५५ किलो ८५६ ग्रॅम अफूचा साठा एका वाहनातून जप्त केला आहे. तसेच संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध पोलिसांक डून प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे.जिल्ह्यात निवडणूक कालावधीत कोठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात ८ आंतरराज्य सीमावर्ती नाके कार्यान्वित असून, तेथे दिवस-रात्र स्थिर देखरेख पथकाकडून संशयास्पद वाहनांची झडती घेतली जात आहे. तसेच जिल्ह्याच्या अंतर्गत १२ ठिकाणी तपासणी नाके सुरू असून, प्रत्येक नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या नाकाबंदीदरम्यान, एका संशयास्पद वाहनाची तपासणी करत असताना सुमारे २ लाख ७९ हजार २८० रुपये किमतीचा ५५ किलो अफूचा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहनासह चालकाला ताब्यात घेतले आहे.तालुुकास्तरावरील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सिंह यांनी सर्वप्रथम विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर छापेमारी करण्याचे आदेश दिले. यानुसार पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्णातील २७४ अवैध धंदे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. या कारवाईमध्ये एकूण २४ लाख १३ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा व २५ लाख ५७ हजार रुपयांची वाहने व अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.३५ शस्रे जमा; ३ तलवारी जप्तआचारसंहिता काळात ग्रामीण पोलिसांनी परवानाधारक व्यक्तींकडून सुमारे ३५ शस्रे जमा केली आहेत. तसेच अवैधरीत्या शस्त्रे बाळगणाऱ्या संशयितांविरुद्ध कारवाई करत ३ तलवारी, दोन कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई दारूबंदी कायद्याप्रमाणे ३९ संशयितांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच१९ सराईत गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव चौकशीसाठी पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस