शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के गणेश मंडळांची महापालिकेकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 01:17 IST

गणेश मंडळांना मंडपासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याची सक्ती असतानादेखील यंदा ४० टक्के मंडळांनी महापालिकेकडे अर्जच केला नाही. त्यामुळे महापालिकेच्या परवानगीशिवाय मंडप उभारण्याची शक्यता गृहीत धरून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे.

नाशिक : गणेश मंडळांना मंडपासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याची सक्ती असतानादेखील यंदा ४० टक्के मंडळांनी महापालिकेकडे अर्जच केला नाही. त्यामुळे महापालिकेच्या परवानगीशिवाय मंडप उभारण्याची शक्यता गृहीत धरून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदा मंडप उभारणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा गमे यांनी शुक्रवारी (दि.२३) गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत दिला आहे.शहरातील गणेश मंडळांची बैठक शुक्रवारी (दि.२३) महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजीव गांधी भवनात पार पडली. गेल्यावर्षी शहरातील ६५० गणेश मंडळांनी मनपाकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते, मात्र यंदा जेमतेम ३६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जागेची तपासणी करून ७८ गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तर २८८ परवानगी अर्जांवर पोलीस प्रशासनासमवेत पाहणी करून येत्या दोन दिवसांत परवानगीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, गणेशोत्सव तोंडावर असताना चाळीस टक्के मंडळांनी पालिकेकडे परवानगीसाठी अर्जच केले नाहीत, त्यामुळे ही मंडळे परवानगीसाठी अर्ज कधी करणार असा प्रश्न गमे यांनी उपस्थित केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विनापरवाना मंडप उभारणी करणाऱ्यांवर करण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने सागंण्यात आले. गणेश मंडळांना महापालिकेने परवानगी दिली तरी जिल्हाधिकाºयांच्या पथकामार्फत तपासणी करावी लागते. गतवर्षी मनपाच्या कार्यवाहीत विसंगती आढळून आल्याने पालिकेच्या विभागीय अधिकाºयांवर कारवाई करावी लागली, असेही आयुक्त गमे यांनी सांगितले.

टॅग्स :ganpatiगणपतीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका