नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाने गेल्या तीन महिन्यांत वाहतूक नियम भंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध धडक कारवाई मोहीम राबवून सुमारे सव्वा पाच कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाई मोहिमेत अवैध प्रवासी वाहतूक, विनायोग्यता प्रमाणपत्र, विनापरवाना चालणारी वाहने, स्कूल बस, रिक्षाचालकांची तपासणी या साऱ्या बाबींचा समावेश आहे. त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून तीन भरारी पथके विविध मार्गांवर तैनात करून त्याआधारे भरारी पथकाने एक कोटी ८२ लाख ३३ हजार दंड व तीन कोटी ५० लाख ६० हजार रुपये कर म्हणजेच ५ कोटी ३२ लाख ९३ हजार रुपये महसूल गोळा केला आहे. याबरोबरच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी अथवा मालवाहतूक करणाऱ्या ५६५ वाहनांची तपासणी करून त्यात अधिक दोषी सापडलेली १५५ वाहने जप्त करण्यात आली व त्यांच्या मालकांकडून एक कोटी २४ लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाची ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
आरटीओ विभागाची पाच कोटींची वसुली
By admin | Updated: August 10, 2015 23:36 IST