शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वाचनालयात ४६ वा ग्रंथालय सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 17:54 IST

सिन्नर : येथील सार्वजनिक वाचनालयात ४६ वा ग्रंथालय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. १४) पासून आठवडाभर सायंकाळी ६ वाजता दररोज नामवंत व्याख्यातांची व्याख्याने होणार आहेत.

सिन्नर : येथील सार्वजनिक वाचनालयात ४६ वा ग्रंथालय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. १४) पासून आठवडाभर सायंकाळी ६ वाजता दररोज नामवंत व्याख्यातांची व्याख्याने होणार आहेत. सप्ताहात साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक अभिरूची संपन्न कार्यक्रम होणार असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी सांगितले. बुधवारी नाशिकचे अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. विनायक गोविलकर यांचे ‘पैसा की लक्ष्मी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी ‘सिन्नर ऐतिहासिक व सांस्कृतिक ग्रंथदर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गोविलकर यांच्या हस्ते होणार आहे. ‘स्त्रीविषयक कायदे आणि समाजाची भूमिका’ या विषयी गुरूवार (दि.१५) अ‍ॅड. अण्णासाहेब सोनवणे मार्गदर्शन करणार आहेत. सध्या ‘मीटू’ मुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि समाज यांच्यावर वस्तूनिष्ठ विवेचन अ‍ॅड. सोनवणे करणार आहे. शुक्रवारी (दि.१६) विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने ‘विधीमंडळ कामकाज व असे नेते... असे प्रसंग’ याविषयी रंजक किस्से सांगणार आहेत. शनिवारी (दि.१७) रोजी मनपा आयुक्त तुकाराम मुंडे ‘नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचे काम नेमके कसे असावे, त्यातून जनतेच्या अपेक्षा कशा पूर्ण होतील याचे परखड तितकेच रंजक विवेचन सादर करणार आहेत. मराठी हास्य कलाकार प्रवीण पंडित व नामवंत कलाकार रविवारी (दि. १८) ‘हास्य हंगामा- ४ हा विनोदी कार्यक्रम सादर करणार आहेत. सोमवारी (दि.१९) प्रसिध्द वक्ते स्वानंद बेदरकर ‘शोध बाप-मुलांच्या नात्याचा’ याविषयी व्याख्यान देणार आहेत. कठोर भूमिकेत वावरणाऱ्या बापाचे हळवे अंतरंग व्याख्यानातून उलगडणार आहे. सिन्नरच्या नामवंत उगवता तारा गायक हर्षद गोळेसर व सहकारी मंगळवारी (दि.२०) रोजी ‘भक्तीसंध्या’ कार्यक्रमात अभंग आणि भक्तीगितांचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. बुधवारी (दि.२०) सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मुंबईचे अमोल शेवडे ‘सुंदर मी होणार, सुंदर मी जगणार’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. व्यक्तीमत्व आणि जीवन दोन्ही सुंदर असेल तर कुटुंबाचा आनंद गगनाला भिडतो. त्यावर मनोगत करणार आहेत. सप्ताहास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यवाह हेमंत वाजे, उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, नरेंद्र वैद्य, संचालक चंद्रशेखर कोरडे, पी. एल. देशपांडे, मनीष गुजराथी, सागर गुजर, जितेंद्र जगताप, अ‍ॅड बीना सांगळे, निर्मला खिंवसरा, सुजाता तेलंग आदींसह संचालक मंडळाने केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी