गंगापूर : दुचाकीवरून हेल्मेट घालून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी रोडवरील शंकरनगर टी पॉइंटजवळून रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातील ४६ हजारांची रोकड असलेली पर्स हिसकावून चोरल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरकरनगर येथील गुलमोहर अपार्टमेंटमधील रहिवासी शोभा गणेश काळे (वय ४५) गुरुवारी (दि.२) दुपारी एक वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील शंकरनगर टी पॉइंटजवळून पायी जात होत्या. यावेळी हेल्मेट घालून एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांना काही कळायच्या आत त्यांच्याजवळील ४६ हजार रुपयांची रोकड असलेली पर्स हिसकावत त्यांना धक्का देऊन बळजबरीने त्यांची पर्स चोरूननेली. त्यानंतर शोभा काळे यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार पी. जी. भूमकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. गंगापूर व गंगापूररोड परिसरात भुरट्या चोºया, सोनसाखळीसह हातील पर्स, बॅग चोरण्यापर्यंत भुरट्या चोरट्यांची मजल गेली आहे. त्यामुळे अशा भुरट्या चोरट्यांवर अंकुश लावण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे आहे.
महिलेची पर्स हिसकावून ४६ हजारांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:29 IST