दिंडोरीत सुरू होणार ४५ खाटांचे काेविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:14 AM2021-04-18T04:14:37+5:302021-04-18T04:14:37+5:30

दिंडोरी पंचायत समितीच्या सभागृहात विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत तालुक्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात ...

A 45-bed Kavid Center will be started in Dindori | दिंडोरीत सुरू होणार ४५ खाटांचे काेविड सेंटर

दिंडोरीत सुरू होणार ४५ खाटांचे काेविड सेंटर

Next

दिंडोरी पंचायत समितीच्या सभागृहात विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत तालुक्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. सामान्य जनता आणि गावपुढारी नियम पाळत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे सांगण्यात आले. गावपातळीवर काम करीत असलेल्या ग्रामसेवकांच्या कामकाजाबाबत बैठकीत ताशेरे ओढण्यात आले. ग्रामसेवकांनी चांगले काम केल्यास प्रत्येक गाव कोरोनामुक्त होऊ शकते, अशी सूचना विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ व माजी आमदार धनराज महाले यांनी केली. दिंडोरी शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता दिंडोरी शहरात गांधीनगर टेकडीवर असलेल्या वसतिगृहात ऑक्सिजन बेडसह ४५ खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्याची तसेच मोहाडी येथे सह्याद्री कंपनीत २० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याची घोषणा विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केली. यावेळी माजी आमदार धनराज महाले, माजी जि.प. सदस्य प्रवीण जाधव, जि.प. सदस्य भास्कर भगरे, डॉ. योगेश गोसावी, डॉ. वाघेरे आदींनी सूचना मांडल्या.

इन्फो

विलगीकरण कक्षासाठी पुढाकार

दिंडोरी तालुक्यात गावोगाव कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो रोखण्यासाठी अनेक गावांतील ग्रामस्थांनी गावातील शाळांमध्ये विलगीकरण केंद्रे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दिंडोरी येथे माजी सरपंच प्रीतम देशमुख, डॉ. विलास देशमुख यांनी बालभारती विद्यालयाची इमारत विलगीकरण कक्षास देण्याचे जाहीर केले, तर ईशानेश्वर स्कूलचे संचालक नितीन गांगुर्डे यांनी त्यांच्या शाळेची इमारत आवश्यकता भासल्यास प्रशासनास देणार असल्याचे सांगितले. सोंनजांब येथे ग्रामस्थांनी मंगल कार्यालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्याची तयारी केली आहे.

Web Title: A 45-bed Kavid Center will be started in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.