नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३०) ४३७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. एकूण ५३२ नवीन रुग्ण आढळले असून, १२ मृत्यूमुळे एकूण बळींची संख्या ४९६ वर पोहोचली आहे.आतापर्यंतच्या बाधितांची संख्या १३,७५९वर पोहोचली असली तरी त्यातील १०,७१७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची सध्याची संख्या केवळ २,५४६वर पोहोचली आहे. त्यात नाशिक मनपा हद्दीत १५७६, नाशिक ग्रामीणला ८७५, मालेगाव महापालिकेत ९३, तर जिल्हा बाह्य रुग्णांमध्ये केवळ दोन जणांचा समावेश आहे. गुरुवारी जिल्ह्णात एकूण १,२८४ नवीन संशयित दाखल झाले आहे. १२ मृतांमध्ये ८ नाशिक मनपा हद्दीतील, तर तीन नाशिक ग्रामीण क्षेत्रातील तर मालेगावच्या एका नागरिकाचा समावेश त्यात आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्ततेच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. मात्र, चाचण्या वाढवण्यात आल्याने रुग्णांच्या संख्येतदेखील भर पडत आहे. गुरुवारच्या ४३७ डिस्चार्जसह आतापर्यंतच्या एकूण कोरोनामुक्तांची संख्या १०,७१७ वर पोहोचली आहे.
दिवसभरात ४३७ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:20 IST
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३०) ४३७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. एकूण ५३२ नवीन रुग्ण आढळले असून, १२ मृत्यूमुळे एकूण बळींची संख्या ४९६ वर पोहोचली आहे.
दिवसभरात ४३७ बाधित
ठळक मुद्देकोरोनामुक्त संसर्ग : जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ७१७ रुग्ण झाले ठणठणीत बरे