शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

नाशकात अकरावी प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी ४०९ अर्ज लॉक ; २०५  अर्जांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 21:15 IST

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत शनिवार (दि.१) पासून आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी ४०९ विद्यार्थ्यांनी त्यांच्या आॅनलाईन अर्जाचा भाग एक भरून लॉक केला आहे

ठळक मुद्देअकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियानाशकात पहिल्याच दिवशी 409 अर्ज लॉक205 ऑनलाईन अर्जांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण

नाशिक : दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत शनिवार (दि.१) पासून आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी ४०९ विद्यार्थ्यांनी त्यांच्या आॅनलाईन अर्जाचा भाग एक भरून लॉक केला आहे. तर त्यापैकी २०५ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पक्रियाही पूर्ण झाली आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ६० कनिष्ठ महाविद्यलाये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध एकूण २५ हजार २५० जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेशअर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया शनिवारपासून झाली आहे. परंतु, या प्रक्रियेत काही विद्यार्थ्यांना आॅनलाईन शुल्क भरण्यात अडचणी आल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या तर काही विद्यार्थ्यांना संकेतस्थळाच्या संथगतीमुळे आॅनलाईनचा भाग एक भरण्यात अडचणी येत असल्याने काही पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शहरातील अकरावी प्रवेशासाठी संकेतस्थळावर शनिवारी (दि.१) सायंकाळपर्यंत २१ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही अशा विद्यार्थ्यांनाही आॅनलाईन नोंदणी करून आॅनलाईन अर्जाचा भाग एक भरता येणार आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी