शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विधीसंघर्षित बालकांवरील ४०८ खटले निकाली

By विजय मोरे | Updated: October 27, 2018 00:18 IST

वयाची पळवाट शोधून गंभीर गुन्ह्यांतून मोकाट सुटणाऱ्या बालगुन्हेगारांना कायद्यातील सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर चाप बसल्याचे चित्र आहे़ जिल्हा न्यायालयातील विधीसंघर्षित बालकांवर सुरू असलेल्या खटल्यांपैकी गत तीन वर्षे नऊ महिन्यांच्या कालावधीत ४०८ खटले निकाली निघाले असून, यामधील बालगुन्हेगारांची संख्या सुमारे पाचशेच्या आसपास आहे़

ठळक मुद्देजिल्हा न्यायालय : खून, चोरी यांसह गंभीर गुन्ह्यांचा समावेश

नाशिक : वयाची पळवाट शोधून गंभीर गुन्ह्यांतून मोकाट सुटणाऱ्या बालगुन्हेगारांना कायद्यातील सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर चाप बसल्याचे चित्र आहे़ जिल्हा न्यायालयातील विधीसंघर्षित बालकांवर सुरू असलेल्या खटल्यांपैकी गत तीन वर्षे नऊ महिन्यांच्या कालावधीत ४०८ खटले निकाली निघाले असून, यामधील बालगुन्हेगारांची संख्या सुमारे पाचशेच्या आसपास आहे़ न्यायालयाने घृणास्पद गुन्ह्यांमध्ये शिक्षा तर इतर गुन्ह्यांमध्ये चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर मुक्त केले आहे़ न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये खून, बलात्कार, चोरी यांसह गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे़शहरातील शरणपूररोडवरील एका प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात पाठविण्यात आलेले गावठी बॉम्बचे पार्सल, मालेगावमधील व्यावसायिकाच्या मुलाचा वीस लाखांच्या खंडणीसाठी करण्यात आलेला खून, इगतपुरी तालुक्यातील मालुंजे येथील अल्पवयीन मुलगी सामूहिक अत्याचार, भुरट्या चोºया, गंभीर व प्राणघातक हल्ले, सायकल-दुचाकी चोरी, चोºया, घरफोड्या यांसारख्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे़नाशिक शहरासह जिल्ह्यात छोट्या-मोठ्या चोºया, घरफोड्या, खून, प्राणघातक हल्ले, हाणामारीपासून तर सामूहिक अत्याचारापर्यंतच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे़ विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये १६ ते १८ या वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे़गरिबी, पैशाची चणचण व्यसनाधीनता, चैनी, विलासी वृत्ती, वाईट संगत, भौतिक सुविधांचे आकर्षण आदी कारणांमुळे लहान वा किशोरवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत होते़ मात्र, सधन कुटुंबातील मुलेही चैनीसाठी गुन्हेगारीकडे वळत असल्याचे समोर आले आहे़बालगुन्हेगारीतमहाराष्ट्र दुसरा...नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने २०१६ मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार फौजदारी गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या विधीसंघर्षित गुन्हेगारांमध्ये महाराष्ट्र दुसºया क्रमांकावर आहे़ गतवर्षी देशभरात ३५,८४९ बालगुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली़ त्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक ७ हजार ३६९, तर त्याखालोखाल महाराष्ट्रात ६ हजार ६०६ बालगुन्हेगारांना अटक करण्यात आली होती़४ दिल्ली (२४९९), बिहार (२३३५), राजस्थान (२२७३), तामिळनाडू (२२१७), छत्तीसगड (१९५३), गुजरात (१६८१), उत्तर प्रदेश (१४३८), हरियाणा (११८६), तेलंगणा (९९८), ओडिशा (९९४), आंध्र प्रदेश (८०९), पश्चिम बंगाल (७०९), केरळ (६२८) यांचा समावेश होता़गंभीर गुन्ह्यांमध्ये प्रौढांप्रमाणे शिक्षाबालगुन्हेगारीवरील नियंत्रणासाठी लोकसभेते ‘ज्युवेनाईल जस्टिस अ‍ॅक्ट -२०१४’ हे विधेयक मंजूर झाले होते़ मात्र राज्यसभेत हे विधेयक मंजूर न झाल्यामुळे दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपीस सोडण्यात आले़ यानंतर देशभरातील आंदोलनांची दखल घेऊन राज्यसभेनेही या विधेयकास मंजुरी दिली़ या नवीन कायद्यामुळे बालगुन्हेगाराची वयाची मर्यादा आता १८ वरून १६ वर्षे झाली आहे़ त्यामुळे १६ वर्षे वयोमर्यादा पूर्ण केलेल्या विधीसंघर्षित मुलाचा गंभीर गुन्ह्यामध्ये सहभाग आढळल्यास त्याच्यावर प्रौढांप्रमाणेच खटला दाखल होऊन शिक्षा केली जाणार आहे़विधीसंघर्षितांमध्ये १६ ते १८वयोगटातील मुलांचे प्रमाण अधिकजिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये चोरी, मारामारी या दोन गुन्ह्यांमध्ये सोळा ते अठरा या वयोगटांतील बालगुन्हेगारांची संख्या अधिक आहे़ बलात्कार, खून या गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचे प्रमाण त्या तुलनेत कमी आहे़ संसदेने केलेल्या या नवीन कायद्यामुळे गुन्हेगारी कृत्यात समावेश असलेले १६ वर्षांच्या आतील मुलेच बालगुन्हेगार समजली जाणार आहेत.या कायद्यामुळे अल्पवयीन मुलांमध्येही कायद्याचा धाक निर्माण होईल व गुन्हेगारी कृत्य करण्यापूर्वी ते निश्चित विचार करतील़

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी