शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
4
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
5
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
6
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
7
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
8
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
9
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
10
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
12
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
13
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
14
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
15
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
16
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
17
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
18
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
19
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
20
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या

४० वैमानिक देशसेवेत ;  ‘कॅट्स’च्या ३०व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षांत सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:44 IST

भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांची ३० वी तुकडी देशसेवेत शनिवारी (दि.१०) दाखल झाली. गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) दीक्षांत सोहळ्यात ४० वैमानिकांना स्कूलचे कमान्डण्ट ब्रिगेडियर सरबजितसिंग भल्ला यांच्या हस्ते ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच भारतीय भूदल सेना व नौसेनेतील एकूण तीन अधिकाºयांना ‘एव्हिएशन प्रशिक्षक बॅच’ देऊन सन्मान करण्यात आला.

नाशिक : भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांची ३० वी तुकडी देशसेवेत शनिवारी (दि.१०) दाखल झाली. गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) दीक्षांत सोहळ्यात ४० वैमानिकांना स्कूलचे कमान्डण्ट ब्रिगेडियर सरबजितसिंग भल्ला यांच्या हस्ते ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच भारतीय भूदल सेना व नौसेनेतील एकूण तीन अधिकाºयांना ‘एव्हिएशन प्रशिक्षक बॅच’ देऊन सन्मान करण्यात आला.गांधीनगर येथे असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी जवानांना लढाऊ हेलिकॉप्टर चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ३०व्या तुकडीचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने ४० वैमानिक देशसेवेसाठी विविध ठिकाणी सेवा देण्यास सज्ज झाले आहेत. दरम्यान, भारतीय भूदलातून दोन, तर भारतीय नौसेनेमधील एक अशा तीन अधिकाºयांनी लढाऊ हेलिकॉप्टरचालन प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल भल्ला यांनी या अधिकाºयांना प्रशिक्षकपदाचा ‘बॅच’ प्रदान करून गौरव केला.युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षितपणे उपचारार्थ तत्काळ हलविणे आदी बाबींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण सुमारे वर्षभराच्या कालावधीत या केंद्रातून प्रशिक्षणार्थी जवानांना देण्यात आले. जवानांचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी लष्करी थाटात ४० वैमानिकांसह तीन प्रशिक्षकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र देण्यात आले.‘आॅपरेशन विजय’ : अंगावर आले शहारेयुद्धजन्य परिस्थितीमध्ये भूदलातील जवानांना महत्त्वाची मदत पोहोचविण्याकरिता लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची असलेली भूमिका ‘आॅपरेशन विजय’द्वारे प्रात्यक्षिकांमधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न ‘कॅट्स’कडून करण्यात आला. ‘आॅपरेशन विजय’ची झलक उपस्थितांच्या अंगावर शहारे आणणारी ठरली. चित्ता हेलिकॉप्टरमधून तत्काळ सैनिकांना रसदचा पुरवठा केला जातो आणि सैनिक शत्रूच्या तळांवर हल्ला चढवितात. अल्पवधीत शत्रूवर विजय मिळवून सैनिक आनंदाने तिरंगा फडकावून सलामी देतात. या आॅपरेशनमध्ये जखमी झालेल्या सैनिकांना पुन्हा ‘चेतक’च्या साह्याने सुरक्षितरीत्या युद्धभूमीवरून हलविले जाते.सुरक्षित उड्डाण हेच उत्कृष्ट वैमानिकाचे ध्येयधाडस व कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक यशस्वी होतो. एव्हिएशन स्कूलच्या उत्तम व्यासपीठावरून तुम्ही राष्टसेवेत दाखल झाले आहात त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कौशल्यपूर्ण कामगिरीवर भर द्या, असा गुरुमंत्र सरबजितसिंग भल्ला यांनी यावेळी दिला. सुरक्षित उड्डाण करत लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न कारकिर्दीत करावा. शारीरिक व मानसिक आरोग्य एका उत्कृष्ट लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकासाठी आवश्यक ठरते हे विसरू नये, असेही ते म्हणाले.

टॅग्स :airforceहवाईदलIndian Armyभारतीय जवान