शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

घोटीत २० वर्षीय युवकाचा किरकोळ कारणावरून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 18:41 IST

घोटी : येथे किरकोळ कारणावरून एका २० वर्षीय युवकाचा चार ते पाच जणांनी घोटी येथे सुरु असलेल्या डांगी प्रदर्शनात खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र चारच तासात घोटी पोलिसांनी संशयित आरोपीना ताब्यात देखील घेतले आहे.

ठळक मुद्दे पाच दिवसांपूर्वी एका हॉटेल मध्ये जेवण करत असतानाच त्यांच्यात वाद झाला होता

घोटी : येथे किरकोळ कारणावरून एका २० वर्षीय युवकाचा चार ते पाच जणांनी घोटी येथे सुरु असलेल्या डांगी प्रदर्शनात खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र चारच तासात घोटी पोलिसांनी संशयित आरोपीना ताब्यात देखील घेतले आहे.घोटीतील डांगी संकरित जनावरांच्या प्रदर्शनात देवळे (ता. इगतपुरी) येथील युवकाचा शनिवारी (दि.१५) रात्री १० वाजेच्या सुमारास खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.इगतपुरी तालुक्यातील देवळे येथील विनोद मच्छींद्र तोकडे (२०) हा आपल्या मित्रांसोबत घोटी येथे डांगी जनावरांचे प्रदर्शन पाहण्यासाठी आला होता.दरम्यान यावेळी माणिकखांब (दि.१५) रोजी येथील संशयित आरोपी सागर गोविंद चव्हाण, रामदास बाळू चव्हाण (१९), अनिकेत अंबादास चव्हाण (२०), रवींद्र बाळू चव्हाण (१९), आकाश ज्ञानदेव चव्हाण (२०), जगन राज चव्हाण (१९), अमोल रामदास चव्हाण (२०) यांनी मयत विनोद तोकडे याच्या डोक्यात लोखंडी हत्याराने मार करून खाली पाडले. त्यांनतर लाथाबुक्यांनी मारहाण करत पोटात चाकूने वार केले.अत्यंत कृर पद्धतीने पोटात वार केल्याने मच्छिंद्र तोकडे मयत झाला. खुनाची घटना घडताच आसपासच्या परिसरातील नागरिकांनी पळ काढला.संशयित आरोपी खून करून फरार होत असतांना घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या पथकाने अवघ्या चार तासातच आरोपींना ताब्यात घेतले.विशेष म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर संशयित आरोपी व मयत गेल्या चार पाच दिवसांपूर्वी एका हॉटेल मध्ये जेवण करत असतानाच त्यांच्यात वाद झाला होता. त्या भांडणाचा काट धरून त्यांनी हे कृत्य केल्याचे समजते.थेट खून करण्याचे धाडस त्यांनी केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने मनोरंजन कार्यक्र म व दुकाने बंद केली. नागरिकांना शांततेचे आवाहन करत आरोपींना पोलीस ठाण्यात आणत मध्यरात्री आठ जणांविरु द्ध गुन्हा दाखल केला.दरम्यान या घटनेचा अधिक तपास सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, आनंदा माळी, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल धुमसे, हवालदार बिपिन जगताप, विश्वास पाटील, अशोक कोरडे, भास्कर शेळके, शितल गायकवाड, संतोष दोंदे, भास्कर महाले, लहू सानप, रमेश चव्हाण, प्रकाश कासार, शरद कोठुळे, रामकृष्ण लहामटे यांनी संशयितांना ताब्यात घेतले.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीCrime Newsगुन्हेगारी