शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

५७ कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील छोट्या गुन्ह्यातील ५७ कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर गेल्या तीन दिवसात सोडण्यात आले. दरम्यान, कारागृहातून जिल्हा रुग्णालय, बँका, कंपन्या, विविध शासकीय कार्यालय यांना आतापर्यंत १५ हजार मास्क बनवून देण्यात आले.

नाशिकरोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील छोट्या गुन्ह्यातील ५७ कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर गेल्या तीन दिवसात सोडण्यात आले. दरम्यान, कारागृहातून जिल्हा रुग्णालय, बँका, कंपन्या, विविध शासकीय कार्यालय यांना आतापर्यंत १५ हजार मास्क बनवून देण्यात आले.गुरु वारी (दि. २६) कारागृहामध्ये मोठ्या गुन्ह्यातील काही कैद्यांनी कोरोना व्हायरसचा फायदा उचलत आम्हालाही जामिनावर सोडावे, याकरिता कैद्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र कारागृह प्रशासनाने सर्व कैद्यांची समजूत घातली. धुळ्याच्या एका खुनाच्या आरोपातील सर्व संशयिताना कारागृह वेगवेगळे ठेवण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी कोरोनामुळे मास्कची टंचाई निर्माण झाल्याने कैद्यांनी आतापर्यंत आठ दिवसात १५ हजार मास्क बनवून विविध बँका, छोटे खुले कारागृह, जिल्हा रुग्णालय, संदर्भ रु ग्णालय, महावितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, खासगी कंपन्या यांना दिले आहेत. कारागृहात दररोज बाराशे ते पंधराशे मास्क तयार केले जातात. कारागृह कारागृहाकडे अजून ८० हजार मास्क बनवून देण्याची मागणी नोंदवण्यात आली आहे. जीएसटीसह पंधरा रुपयात एक मास्क दिला जात असल्याचे कारागृह कारखाना विभाग प्रमुख पल्लवी कदम यांनी सांगितले. कारागृहामध्ये कामावरयेणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी कैदी यांची थर्मामीटरद्वारेतपासणी करूनच आतमध्ये सोडले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंग