लोकमत न्युज नेटवर्कयेवला : शहरासह तालुक्यातील ४ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. निमगाव मढ येथील ६५ वर्षीय बाधित पुरूषाचा नाशिक जिल्हा रूग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर चौघांचे रॅपीड अँटीजेन टेस्ट अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. दरम्यान आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या ३२ संशयितांचे स्वॅब अहवालाची प्रतिक्षा आहे.बाधितांमध्ये शहरातील मेनरोड, परदेशपुरा, पाटीलवाडा, बाजीराव नगर येथील रूग्णांचा समावेश आहे. जिल्हा रूग्णालयातून १ तर होम कोरंटाईन असलेले ३ असे एकूण ४ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ६०८ झाली असून आजपर्यंत ४७७ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ४१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ९५ असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.
येवल्यातील ४ बाधित कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 19:00 IST
येवला : शहरासह तालुक्यातील ४ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. निमगाव मढ येथील ६५ वर्षीय बाधित पुरूषाचा नाशिक जिल्हा रूग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर चौघांचे रॅपीड अँटीजेन टेस्ट अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. दरम्यान आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या ३२ संशयितांचे स्वॅब अहवालाची प्रतिक्षा आहे.
येवल्यातील ४ बाधित कोरोनामुक्त
ठळक मुद्देएकाचा मृत्यू; ४ अहवाल पॉझीटीव्ह