शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

नाशिक शहरातील ३८ सायकलिस्टने केली पूर्ण नाईट बीआरएम राईड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 12:59 IST

बीआरएम म्हणजेच ब्रेवे रँडोनर्स माँडियॉक्स या उपक्र मातील २०० किमीची नाईट राईड येथील ३८ रायडर्सनी पुर्ण

ठळक मुद्देराईड यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी १३.५ तासांची वेळ देण्यात आली होती धुळ्याच्या एका जोडप्यासह एकूण ५ महिलांनी सहभाग घेत राईड पूर्ण

नाशिक : बीआरएम म्हणजेच ब्रेवे रँडोनर्स माँडियॉक्स या उपक्र मातील २०० किमीची नाईट राईड येथील ३८ रायडर्सनी पुर्ण केली. या मोहिमेला शनिवार (दि. १४) पासून प्रारंभ करण्यात आला. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून बचाव व्हावा म्हणून सलग तिसऱ्या वर्षी एप्रिल महिन्यातील ही राईड रात्रीच्यावेळी काढण्यात आली.शनिवारी संध्याकाळी ६ वाजता मुंबईनाका येथून प्रारंभ करून - सोग्रास फाटा (चांदवड मार्गावरील) - नाशिक- घाटानेवारी मंदिर (नागपूर) - नाशिककडे परत असा राईडचा मार्ग होता. राईड यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी १३.५ तासांची वेळ देण्यात आली होती. राईडला सुरु वात केलेल्या ४० पैकी ३८ राइडर्सने रात्रभर राइड करत रविवारी (दि. १५) सकाळी ७.३० वाजेच्या आत राईड पूर्ण केली. मुंबईचे रँडोनर सायकलिस्ट कबीर राचुरे, डॉ. महेंद्र महाजन यांनी केवळ सात तास १५ मिनिटात ही बीआरएम पूर्ण केली तर भारतीय आर्मीचे भारत पन्नू यांनी सात तास ३० मिनिटात राईड पूर्ण केली. विशेष म्हणजे यात धुळ्याच्या एका जोडप्यासह एकूण ५ महिलांनी सहभाग घेत राईड पूर्ण केली आहे. दोन महिन्यापूर्वी सायकलिंग सुरु करणाºया कल्याणी मोरे, सायकलिस्ट असोसिएशनचे डॉ. महेंद्र महाजन, डॉ. मनीषा रौंदळ, नीता नारंग, पल्लवी पवार, शारदा शितोळे या महिलांनी राईड पूर्ण करत इतर महिला सायकलिस्ट समोर आदर्श ठेवला आहे. नाईट बीआरएम मध्ये सहभागी होणाºयांची संख्या प्रत्येक राईडला वाढत असल्याची नोंद असून नाईट बीआरएम दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. हर्शल पवार, नितीन कोतकर आणि डॉ. नितीन रौंदळ यांन संपूर्ण राईड साठी मार्शलिंग केले. संपूर्ण भारतातील बीआरएमशी संलग्न असून फ्रान्समधील जगभरातील ब्रॅव्हट्सची देखरेख करणााºया एसीपीशी संबंधित आहे.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा