नाशिक : आशियातील सर्वांत मोठ्या नाशिक आर्टिलरी तोफखाना सेंटरमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचा शपथविधी सोहळा सैनिकीशिस्तीत पार पडला. ४४ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ‘तोफची’ झालेले जवान देशसेवेची शपथ घेऊन देशसेवेत दाखल झाले. या प्रशिक्षणात उत्कृष्ट टेक्निकल असिस्टंट म्हणून अविनाशकुमार हा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरला, तर उत्कृष्ट तोफचीचा पुरस्कार अमन राणा याने पटकाविला.नाशिकरोड आर्टिलरी तोफखाना सेंटर येथे या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेहोते. लेफ्टनंट कर्नल आणि आर्टिलरी रेजिमेंट आर्मीचे संचालक पी. के. श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत जवानांनी शानदार संचलन करीत आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. यावेळी श्रीवास्तव म्हणाले.भारतीय सेनेत आर्टिलरीचे महत्त्व नेहमीच अधोरेखित झाले आहे. आपले कौशल्यआणि धारिष्ट्य सिद्ध करीत तोफखाना जवानांनी १९४७-४८, १९७१ मधील भारत-पाक युद्धात तसेच १९९९ मधील कारगिल युद्धात तसेच १९६२ च्या भारत-चीन युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली आहे, असे त्यांनी सांगितले.पालकांनाही गौरव पदकतोफखान्याचे खडतर आणि आव्हानात्मक प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेत दाखल झालेल्या जवानांबरोबरच त्याच्या पालकांनाही लेफ्टनंट कर्नल पी. के. श्रीवास्तव यांनी ‘गौरव पदक’ देऊन त्यांचाही सन्मान केला. देशसेवेसाठी आपल्या कुटुंबातील तरुणांना भारत मातेच्या स्वाधीन केल्याने पालकांचेही योगदान लक्षात घेत त्यांचा आर्टिलरीतर्फे सन्मान केला जातो. त्यानुसार पदवी सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेल्या जवानांच्या आप्तेष्टांचाही गौरव पदक प्रदान करण्यात आले.उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीटेक्निकल असिस्टंट (अविनाशकुमार)४ उत्कृष्ट तोफची(अमन राणा)४ उत्कृष्ट आॅपरेटर(राहुल नवले)४ उत्कृष्ट टेक्निकल असिस्टंट (अविनाश कुमार)४ उत्कृष्ट ड्रायव्हर मेकिनिकल ट्रान्सपोर्ट (निर्मल हमाल)४ उत्कृष्ट फिजिकल टेस्ट (रणधीरकुमार शर्मा)४ उत्कृष्ट वेपन ट्रेनिंग (तोफची संदीप सिंग)४ बेस्ट इन ड्रील(गौरव चव्हाण)४ बेस्ट टीडीएन(मारुती बाळप्पा पुजारी)
३७८ जवानांची तुकडी देशसेवेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:27 IST
आशियातील सर्वांत मोठ्या नाशिक आर्टिलरी तोफखाना सेंटरमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचा शपथविधी सोहळा सैनिकीशिस्तीत पार पडला. ४४ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ‘तोफची’ झालेले जवान देशसेवेची शपथ घेऊन देशसेवेत दाखल झाले.
३७८ जवानांची तुकडी देशसेवेत दाखल
ठळक मुद्देपासिंग आउट परेड : अविनाशकुमार ठरला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी