शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कळवणमध्ये २७ ग्रामपंचायतींसाठी ३७६ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:53 IST

कळवण : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी भुसणी व तताणी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, सप्तशृंगगड, अभोणा, कनाशी, वडाळे (हातगड) ग्रामपंचायतीव्यतिरिक्त २३ ग्रामपंचायतींमधील ८४ जागा बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले आहे. २९ ग्रामपंचायतींमधील ६०१ इच्छुकांपैकी ११८ इच्छुकांनी माघार घेतल्याने १०२ जागा बिनविरोध झाल्या असून, त्यात तताणी व भुसणी ग्रामपंचायतचा समावेश आहे. २७ ग्रामपंचायतींच्या १५९ जागांसाठी ३७६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

ठळक मुद्देअटतटीच्या लढती : भुसणी, तताणी ग्रामपंचायत बिनविरोध

बापखेडा ग्रामपंचायतच्या ८ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने ८ जागा बिनविरोध झाल्या असून, ३ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. काठरे दिगर ग्रामपंचायतच्या ५ इच्छुकांनी माघार घेतली असून, १ जागा बिनविरोध झाली तर ८ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. मोहनदरी ग्रामपंचायतच्या २ जागा बिनविरोध झाल्या असून, ९ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. कनाशी ग्रामपंचायतच्या १५ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. नरूळ ग्रामपंचायतच्या ३ इच्छुकांनी माघार घेतली असून ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता ६ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. बिलवाडी ग्रामपंचायतच्या २ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने ४ जागा बिनविरोध झाल्या असून ३ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत.मुळाने वणी ग्रामपंचायतच्या २ जागा बिनविरोध झाल्या असून ५ जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. देवळी वणी ग्रामपंचायतच्या एका इच्छुकाने माघार घेतली असून ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ४ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत. बोरदैवत ग्रामपंचायतच्या ६ इच्छुकांनी माघार नोंदवली असून, ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ३ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. ओझर ग्रामपंचायतच्या ४ इच्छुकांनी माघार नोंदवली असून, १ जागा बिनविरोध झाली आहे. ६ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. पळसदर ग्रामपंचायतच्या २ इच्छुकांनी माघार नोंदवली असून १ जागा बिनविरोध झाली आहे. ८ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. भगुर्डी ग्रामपंचायतच्या ४ इच्छुकांनी माघार घेतली असून, ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. २ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत.सावकीपाळे ग्रामपंचायतच्या एका इच्छुकाने माघार घेतली तर २ जागा बिनविरोध झाल्या असून ५ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहे. लिंगामा ग्रामपंचायतच्या २ इच्छुकांनी माघार नोंदवली असून, ३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ६ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. वडाळे हातगड ग्रामपंचायतच्या एका इच्छुकाने माघार घेतली. ९ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत.अभोण्यात ३३ उमेदवारअभोणा ग्रामपंचायतच्या २३ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने १३ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात आहेत. कुंडाणे (क) ग्रामपंचायतच्या ८ इच्छुकांनी माघार घेतल्याने ८ जागा बिनविरोध झाल्या असून, १ जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. जामले वणी ग्रामपंचायतच्या ३ इच्छुकांनी माघार घेतल्याने ९ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. वीरशेत ग्रामपंचायतच्या ८ जागा बिनविरोध झाल्या असून, १ जागेसाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत.सप्तशृंगगडावर चुरससप्तशृंगगड ग्रामपंचायतच्या ७ इच्छुकांनी माघार घेतली, तर ९ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. नांदुरी ग्रामपंचायतच्या ५ इच्छुकांनी माघार घेतली असून २ जागा बिनविरोध झाल्या आहेत. ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. गोसराणे ग्रामपंचायतच्या ३ इच्छुकांनी माघार नोंदवल्याने ६ जागा बिनविरोध झाल्या असून, ३ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहे. भुसणी ग्रामपंचायतच्या ३ इच्छुकांनी माघार घेतल्याने ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, कळमथे ग्रामपंचायतच्या २ इच्छुकांनी माघार घेतली आहे. ३ जागा बिनविरोध झाल्या असून ४ जागांसाठी ९ उमेदवार रिंगणात आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत