शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या ३७ शाळांचे विलीनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:28 IST

महापालिका शाळांच्या पडताळणीनंतर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि पटावरील विद्यार्थ्यांची संख्या यात तफावत आढळून आल्याने एकूण ३७ शाळांचे जवळच्याच मनपाच्या शाळांमध्ये विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली आहे. या निर्णयामुळे नव्याने शिक्षकांच्या नियुक्तीचाही प्रश्न संपुष्टात आला आहे.

नाशिक : महापालिका शाळांच्या पडताळणीनंतर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि पटावरील विद्यार्थ्यांची संख्या यात तफावत आढळून आल्याने एकूण ३७ शाळांचे जवळच्याच मनपाच्या शाळांमध्ये विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली आहे. या निर्णयामुळे नव्याने शिक्षकांच्या नियुक्तीचाही प्रश्न संपुष्टात आला आहे. महानगरपालिका नाशिक शिक्षण विभागाच्या १०९ मराठी, ४ हिंदी व १३ उर्दू माध्यमांच्या एकूण १२६ शाळा आहेत. सदर शाळांमध्ये एकूण २९ हजार विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत. एकूण ९४० शिक्षक अध्यापनाचे कामकाज करत आहेत. या शाळांची गेल्या काही दिवसांपासून शिक्षण विभागामार्फत पडताळणी सुरू होती. या पडताळणीत काही शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती, पटावरील विद्यार्थ्यांच्या प्रमाणात तफावत आढळून आली. शासन निकषानुसार इयत्ता पहिलीचा वर्ग असलेल्या दोन शाळांमधील अंतर किमान १ कि.मी. असणे आवश्यक आहे. तथापि, महानगरपालिकेच्या काही शाळा त्यापेक्षा कमी अंतरात किंवा एकाच आवारात असल्याने विद्यार्थी पट व उपस्थिती यात तफावत आढळून आली. शासन निकषानुसार ३० विद्यार्थ्यांच्या प्रमाणात एक शिक्षक देय आहे. शालेय इमारत व पुरेशा वर्गखोल्या उपलब्ध असताना वेगवेगळ्या ठिकाणी शाळा भरविणे विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करता संयुक्तिक ठरत नसल्याचेही लक्षात आले. त्यामुळे शाळेतील पटावरील विद्यार्थी, प्रत्यक्ष उपस्थिती, शिक्षक व विद्यार्थ्यांचचे गुणोत्तर प्रमाण, उपलब्ध इमारती व वर्गखोल्या, दोन शाळांमधील असलेले प्रत्यक्ष अंतर लक्षात घेऊन सर्व १२६ शाळांमधील कमी पट व अल्प उपस्थितीच्या शाळांचे जवळच्या अथवा त्याच आवारातील अस्तित्वातील शाळेमध्ये विलीनीकरण करून शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची बाब विचाराधीन होती.१ मेपासून अंमलबजावणीसदर निर्णयाची अंमलबजावणी १ मे २०१८ पासून करण्यात येणार आहे. यातील नियोजनानुसार मूळ शाळेतील विद्यार्थी जवळच्या विलीनीकरण होणाऱ्या शाळेत दाखल करून त्या शाळेतील सर्व कागदपत्रे, मूळ रेकॉर्ड आणि सर्व भौतिक साहित्य समायोजित शाळेत जमा करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पालकांच्या सभेमध्ये याबाबत माहिती देऊन १५ जून २०१८ रोजी सदरचे विद्यार्थी त्या-त्या संबंधित शाळेत उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा