शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकेच्या तपासणीत सोसायटीत ३७ लाखांचा अपहार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:43 IST

जिल्हा बँकेची सन २०१८-१९ मध्ये वसुलीस पात्र असलेली रक्कम २३३१ कोटी असून, त्यापैकी १९२१ कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी बँकेने १ मार्चपासून धडक मोहीम सुरू केली आहे. सर्वाधिक थकबाकी असलेल्या दिंडोरी तालुक्यातील थकबाकीदार सभासदांची प्राप्त १०१ वसुली प्रमाणपत्राच्या आधारे

ठळक मुद्देजिल्हा बॅँकेची वसुली : गुन्हा दाखल करण्यासासाठी पोलिसांना पत्रमूल्यांकन निश्चितीनंतर मालमत्तांची लिलाव प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या कर्जवसुलीला काही ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना काही ठिकाणी मात्र या निमित्ताने बॅँकांच्या शाखांमध्ये तसेच विविध कार्यकारी सोसायटींमध्ये गैरप्रकारदेखील उघडकीस येऊ लागले आहेत. सटाण्यामधील वीरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तपासणीत ३७ लाखांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याला बँक प्रशासनाने पत्र दिले असून, लवकरच या संदर्भात गुन्हा दाखल होण्याची चिन्हे आहेत. बॅँकेच्या या पवित्र्यामुळे वि. का. संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्हा बँकेची सन २०१८-१९ मध्ये वसुलीस पात्र असलेली रक्कम २३३१ कोटी असून, त्यापैकी १९२१ कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी बँकेने १ मार्चपासून धडक मोहीम सुरू केली आहे. सर्वाधिक थकबाकी असलेल्या दिंडोरी तालुक्यातील थकबाकीदार सभासदांची प्राप्त १०१ वसुली प्रमाणपत्राच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कर्जवसुली करावी. कर्ज न भरणाऱ्या सभासदांची शेतजमीन जप्त करून तिच्या लिलावाद्वारे वसुली करण्याचाही निर्णय बॅँकेने घेतला आहे. त्यादृष्टीने बँकेने कर्जवसुली मोहिमेंतर्गत जप्त केलेल्या मालमत्तांचे मूल्यांकन निश्चितीनंतर मालमत्तांची लिलाव प्रक्रियादेखील राबविली. त्यात नांदगाव तालुक्यातील मनमाड फळबाग व भाजीपाला खरेदी-विक्री संघाकडे बँकेची ३९ लाख ९१ हजार थकबाकी वसुलीसाठी बँकेने संस्थेची तारण मालमत्ता लिलावाद्वारे विक्री केली. या विक्रीतून ११ लाख ११ हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे.बँक प्रशासनाने वसुलीसाठी विविध कार्यकारी संंस्थांच्या तपासणीसाठी विशेष पथक तयार केले आहे. या पथकाने सटाणा तालुक्यातील वीरगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७ या पाच वर्षांच्या कालावधीतील संस्थेच्या व्यवहारांची तपासणी केली. या तपासणी कालावधीत ३७ लाखांचा अपहार झाल्याचे आढळून आले. तपासणी कालावधीत आढळून आलेल्या आर्थिक अनियमिततेस व गैरव्यवहारास संस्था चेअरमन, संचालक मंडळ व संस्था सचिव जबाबदार असल्याने संस्थेचे संचालक मंडळ व सचिव जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत शिफारस असलेला अहवाल बँकेला सादर झाला. या अहवालानुसार बँकेने संस्थेचे संचालक मंडळ व सचिव यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंबंधी तक्रार केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :bankबँकNashikनाशिक