नाशिक : नाशिक शहर पोलीस भरतीप्रक्रि येसाठी गुरुवारी एकूण ९५० अर्जदारांना मैदानावर शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. यावेळी ६७४ उमेदवार हजर राहिले, तर २७६ उमेदवारांनी गैरहजर राहणे पसंत केले. शारीरिक चाचणीसाठी आलेल्या ६७४ उमेदवारांपैकी ३७ उमेदवार अपात्र ठरले. या उमेदवारांची धावण्याची शर्यत गोदापार्कलगतच्या मखमलाबाद-चांदशी रस्त्यावर घेण्यात आली.शहरात पोलीस भरतीप्रक्रिया राबविली जात असून, या प्रक्रि येवर दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल लक्ष ठेवून आहे. सिंगल यांनी गुरुवारी सकाळी मैदानावर हजेरी लावून भरतीसाठी आलेल्या तरुण उमेदवारांशी थेट संवाद साधला व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नम्रपणे वागण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.शहर पोलीस आयुक्तालयात शिपाई पदाच्या रिक्त ७९ व बॅण्ड पथकातील १८ अशा एकूण ९७, तर ग्रामीण पोलीस दलामधील रिक्त ७२ जागांसाठी ही भरतीप्रक्रिया राबविली. शहर पोलीस भरती ही पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर, तर ग्रामीण पोलीस भरतीप्रक्रिया ही आडगावच्या ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होत आहे़ शहर पोलीस शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या भरतीप्रक्रियेसाठी दुसऱ्या दिवशी ९५० अर्जदारांना बोलविण्यात आले होते़, तर आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर दुसऱ्या दिवशी १२०० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते़ त्यापैकी ७९४ उमेदवार हजर राहिले, तर ४०६ उमेदवारांनी दांडी मारली़ हजर उमेदवारांपैकी शारीरिक चाचणीमध्ये १०० उमेदवार अपात्र ठरले, तर एका उमेदवाराने स्वच्छेने माघार घेतली. दरम्यान, सिंगल यांनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हजेरी लावत भरतीप्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या. तसेच आलेल्या सर्व उमेदवारांशी पोलिसांनी नम्रतेने बोलावे व त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करावे, जेणेकरून भावी पोलिसांमध्ये पोलीस दलाविषयी असलेला सकारात्मक दृष्टिकोन अधिक वाढीस लागण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)
६७४ पैकी ३७ उमेदवार ठरले अपात्र
By admin | Updated: March 24, 2017 00:23 IST