शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

नाशिकमधील ३५०० डॉक्टर आज संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 14:02 IST

शहरातील जिल्हा शासकिय रुग्णालये, महापालिकेची रुग्णालये तसेच ग्रामिण भागातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांवरुन वैद्यकिय सुुविधा सुरळीतपणे पुरविली जात असून रुग्णांनी या वैद्यकिय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य उपसंचालकांनी केले आहे.

ठळक मुद्देवैद्यकिय विधेयक श्रीमंती पोसणारे शहरातील अडीच हजार व जिल्ह्यातील एक हजार डॉक्टर सहभागी

नाशिक : राष्ट्रीय वैद्यकिय आयोग विधेयक लोकसभेत मांडले जाणार असून हे विधेयक देशातील वैद्यकिय क्षेत्र व त्यासंबंधीत सर्व घटकांचे नुकसान करणारे असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. या विधेयकाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी संघटनेने राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे. या संपात नाशिक शहरातील अडीच हजार व जिल्ह्यातील एक हजार असे एकूण साडे तीन हजार डॉक्टर सहभागी असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यातील बाह्यरुग्ण तपासणी आज खासगी डॉक्टरांकडून बंद ठेवण्यात आली आहे. शहरातील विविध डॉक्टरांच्या दवाखान्यांमध्ये ‘आज डॉक्टर संपावर’ असे सुचना फलक लावण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. बहुतांश नागरिकांना विनाआरोग्य तपासणी माघारी फिरावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनकडून शहरातील खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण यांना या विधेयकाच्या विरोधात निवेदन देण्यात आले आहेत. निवेदनासोबत विधेयकामधील हानीकारक तरतुदींचेपत्रही जोडण्यात आले आहेत. या विधेयकाबाबत शहरातील आयएमएच्या कार्यालयात सर्व सभासद डॉक्टरांची संयुक्त बैठक सुरू असून या बैठकीत विधेयक वैद्यकिय क्षेत्रासाठी कशा पध्दतीने मारक ठरणार आहे, यावर चर्चा सुरू आहे. हे राष्ट्रीय वैद्यकिय विधेयक श्रीमंती पोसणारे असून गरीबीवर यामुळे संकट येणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. शहरात अ‍ॅलोपॅथीद्वारे उपचार करणारे सुमारे सुमारे पाचशे रुग्णालये आहेत. तसेच दवाखान्यांची संख्या १ हजारावर आहे. वैद्यकिय विद्यार्थी संघटनेनेही संपाला पाठिंबा दिला आहे. यामुळे वैद्यकिय महाविद्यालयेदेखील आज बंद आहे. शहरातील जिल्हा शासकिय रुग्णालये, महापालिकेची रुग्णालये तसेच ग्रामिण भागातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांवरुन वैद्यकिय सुुविधा सुरळीतपणे पुरविली जात असून रुग्णांनी या वैद्यकिय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य उपसंचालकांनी केले आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयdoctorडॉक्टरStrikeसंपNashikनाशिक