शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

३४६ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:31 IST

कर्जमाफी : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नावे असलेले कर्जमाफ करण्याची घोषणा केल्याने त्याचा लाभ जिल्ह्णातील ३४६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले असून, कर्जमाफीची तसेच दहा हजार रुपयांचे पीककर्ज देण्याची घोषणा करून महिना उलटला तरी त्याचा लाभ झाला नसल्याची तक्रार केली जात आहे. त्यावर सरकारनेही आपली भूमिका मांडताना ज्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून आत्महत्या केली त्या कुटुंबीयांच्या नावे असलेले कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या या घोषणेपूर्वी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली असली तरी, त्याच्या डोक्यावर असलेले कर्ज त्याच्या कुटुंबीयांच्या डोक्यावर कायम होते, किंबहुना सातबारा उताऱ्यावर कर्जाची नोंद असल्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना फेर कर्ज घेण्यास अडचणी येत होत्या. चालू वर्षी ६४ आत्महत्याशेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात वाढच होत असून, चालू वर्षी जानेवारी ते जुलैपर्यंत ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी सन २०११ (३४), २०१२ (१९), २०१३ (१५), २०१४ (४२), २०१५ (८५), २०१६ (८७) २०१७ (६४) शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्णात गेल्या सहा वर्षांत ३४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, सन २०१५ ते १७ या तीन वर्षांच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश असल्याने तर अधिकच चिंता व्यक्त करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटनांना रोखण्यात शासनाला अपयश आले आहे.