शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

ताठेच्या गुदामातून  ३४ लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 1:14 AM

केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नेटवर्क तयार करून गांजाची तस्करी करणाऱ्या शिवसेनेची महिला पदाधिकारी संशयित लक्ष्मी ताठे हिच्या औरंगाबाद रोडवरील जनार्दननगरमधील गुदामावर शहर गुन्हे शाखेने बुधवारी (दि़ १०) छापा टाकत पोलिसांनी ३४ लाख ५० हजार रुपयांचा ६९० किलो गांजा जप्त केला. ताठेचा जावई सुमित बोराळे (रा़ अंबड) व त्याचा साथीदार सुरेश महाले (रा़ पंचवटी) यांना अटक झाली आहे़

पंचवटी : केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नेटवर्क तयार करून गांजाची तस्करी करणाऱ्या शिवसेनेची महिला पदाधिकारी संशयित लक्ष्मी ताठे हिच्या औरंगाबाद रोडवरील जनार्दननगरमधील गुदामावर शहर गुन्हे शाखेने बुधवारी (दि़ १०) छापा टाकत पोलिसांनी ३४ लाख ५० हजार रुपयांचा ६९० किलो गांजा जप्त केला. ताठेचा जावई सुमित बोराळे (रा़ अंबड) व त्याचा साथीदार सुरेश महाले (रा़ पंचवटी) यांना अटक झाली आहे़  ११ जून रोजी तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ उभ्या असलेल्या आयशरमधून गांजा मागविण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाºयांना मिळाली होती़   त्यानुसार या पथकाने कारवाई करून या वाहनातून ३५ लाख रुपये किमतीचा ६८० किलो गांजा जप्त केला होता़ पोलिसांनी जप्त केलेला गांजा हा ओडिसा येथून मागविण्यात आल्याचे तसेच त्याचे वितरण हे नाशिक शहर व जिल्ह्णासह संपूर्ण राज्यात केले जाणार असल्याची माहिती तपासात समोर आली़ आयशरचालक व त्याच्या साथीदारास अटक केल्यानंतर गांजातस्करीत शिवसेनेची महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे व तिच्या सहकाºयाचा हात असल्याचे समोर आले़पोलिसांनी तपोवनात गांजा पकडल्यानंतर ताठे फरार झाली तर याच कालावधीत पोलिसांनी सिन्नर येथून ३९० किलो गांजा जप्त केला़ पोलिसांच्या कारवाईनंतर ताठे हिने सुरुवातीला कर्णनगर येथील घरी व त्यानंतर कारवाईच्या भीतीने हा गांजा नवनाथनगरला लपवून ठेवला होता़ तीन ते चार दिवसांपूर्वीच ताठे हिचा जावई सुमीत बोराळे याने मंडपवाला साथीदार सुरेश महाले याच्या मदतीने हा गांजा औरंगाबादरोडवरील जनार्दननगरच्या गुदामात लपवून ठेवला़ पोलीस कोठडीत असलेल्या ताठेच्या चौकशीत ७०० किलो गांजा हा गुदामात असल्याची माहिती समोर आली़पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक बलराम पवार, वसंत पांडव, येवाजी महाले, संदीप भांड, विशाल देवरे, रवि बागुल, विशाल काठे यांनी बुधवारी (दि़ ११) दुपारी या गुदामात छापा टाकून ६९० किलो गांजा जप्त केला़ गांजातस्करीच्या रॅकेटमध्ये आतापर्यंत पोलिसांनी अकरा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, नऊ जणांना अटक केली असून एक कोटीहून अधिक रुपयांचा १ टन ७६० किलो गांजा जप्त केला आहे़साथीदार फरारगांजा तस्करीच्या रॅकेटमध्ये पोलिसांनी आतापर्यंत ओडिसाहून गांजाचा पुरवठा करणारा अकबर सदबल खान (रा. जयपोर, ओडिसा), आयशर वाहनातून गांजाची वाहतूक करणारे यतिन शिंदे व सुनील शिंदे, सिन्नर येथून संतोष गोळेसर, जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथून सुरेश रामसिंग बेलदार व सुखदेव शहादेव पवार तर पंचवटीतून लक्ष्मी ताठे यांना अटक केली आहे़ दरम्यान, तस्करीतील ताठेचा साथीदार अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय