शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शवागारात अद्यापही  ३४ मृतदेह पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:16 IST

महापालिका व पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना नेहमीच बसतो. मात्र बेवारसस्थितीत आढळलेल्या मानवी मृतदेहांचा अखेरचा प्रवासदेखील या दोन्ही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुमारे तीन ते चार महिन्यांपासून रखडला आहे.

नाशिक : महापालिका व पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना नेहमीच बसतो. मात्र बेवारसस्थितीत आढळलेल्या मानवी मृतदेहांचा अखेरचा प्रवासदेखील या दोन्ही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुमारे तीन ते चार महिन्यांपासून रखडला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहर-ग्रामीण पोलिसांकडून याबाबत अंतिम अहवाल महापालिका प्रशासनाकडे सोपविला गेला नसल्यामुळे ३४ मृतदेह शवागारात पडून असल्याचे समजते.शहरासह जिल्ह्यात अपघाती अथवा नैसर्गिकरीत्या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची ओळख न पटल्यास त्यांचे मृतदेह येथील शवागारात पोलीस तपास होईपर्यंत ठेवले जातात. या बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी १४ दिवसांची मुदत संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना दिली जाते. या मुदतीत चौकशी करून ओळख पटल्यास संबंधित नातेवाइकांकडे मृतदेह सोपवावे अन्यथा तसा अहवाल महापालिका प्रशासनाकडे द्यावा, अशी याबाबत शासकीय व्यवस्था आहे. मात्र मागील काही दिवसांपासून बेवारस मृतदेहांच्या चौकशीपासून सगळ्याच बाबतीत उदासीन भूमिका शहर व ग्रामीण पोलिसांनी घेतल्यामुळे दुर्दैवी अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू पावलेल्या बेवारस, अनोळखी देहांचा अंत्यसंस्काराचा मार्ग खुला होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागारात एकूण ५६ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे; मात्र  त्यापैकी काही कप्पे नादुरुस्त यंत्रणेमुळे वापरात आणणे प्रशासनाला शक्य होत नाही. रुग्णालयाकडून शवागाराच्या देखभाल दुरुस्तीकडे फारसे लक्ष पुरविले जात नाही. त्यामुळे शवागृहाची क्षमता संपुष्टात आली आहे. सध्या शवागारातील मृतदेहांची संख्या ३४वर पोहचली असून, यामध्ये बहुतांश देह कुजलेल्या अवस्थेपर्यंत पोहचले असून त्यांना दुर्गंधी सुटली आहे.पावसाळ्यात परिसरात रुग्णालयातूनच साथीचे आजार पसरण्याचा धोका यामुळे निर्माण झाला आहे. बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लवकरात लवकर लावली न गेल्यास जिल्हा रुग्णालयातील वातावरण रोगट होऊन इतर रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यास विलंब होण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे.मृतदेहांच्या हेळसांडचे गांभीर्य नाही३४ मृतदेहांपैकी बहुतांश कुजलेल्या अवस्थेत आहेत. एक मृतदेह २२५ दिवसांपासून पडून आहे, तर दोन मृतदेह २०० दिवसांपासून आणि आठ ते दहा मृतदेह १५० दिवसांपासून पडून आहेत. यावरून पोलिसांकडून बेवारस मृतदेहांबाबत किती गांभीर्याने चौकशी केली जाते हे स्पष्ट होते. मृतदेहांची हेळसांड संबंधित पोलीस प्रशासनाने थांबवावी, अशी मागणी होत आहे. २० मृतदेह शहर व १४ ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलDeathमृत्यूNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका