शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वीजनिर्मिती क्षमतेत ३२८० मेगावॉटची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:26 IST

महानिर्मिती कंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेमध्ये ३२८० मेगावॉट इतकी वाढ झालेली असल्यामुळे राज्य आता भारनियमनमुक्त झाल्याचा दावा एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला आहे.

नाशिक : महानिर्मिती कंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेमध्ये ३२८० मेगावॉट इतकी वाढ झालेली असल्यामुळे राज्य आता भारनियमनमुक्त झाल्याचा दावा एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला आहे. महावितरण कंपनीच्या चार वर्षांच्या कामांची माहिती देण्यासाठी पाठक नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाठक यांनी सांगितले की, कंपनीने ५० मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प व ३२३० मेगावॉटचे औष्णिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केल्यामुळे राज्यातील विजेची उपलब्धता वाढली आहे. दिवाळीत पाचशे ते साडेपाचशे मेगावॉटची तूट निर्माण झाल्याने काही काळ भारनियमन करावे लागले. परंतु आता वाढविलेली वीजनिर्मिती आणि खासगी वीजनिर्मिती कंपन्यांशी केलेल्या करारामुळे विजेसाठी राज्य स्वयंपूर्ण बनल्याचे पाठक म्हणाले. सद्यपरिस्थितीत राज्यात सर्व भागात अखंडित वीजपुरवठा सुरू असून, कृषी ग्राहकांना चक्राकार पद्धतीने दररोज ८ ते १० तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.  गेल्या २२ आॅक्टोबर रोजी तब्बल २४,९३२ मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली होती. ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्णातील मेळघाट या अतिदुर्गम आदिवासी उपयोजना क्षेत्रात १३२ केव्ही, धारणी उपकेंद्र तसेच नेपानगर ते धारणी अशी ६० किमीची आंतरराज्य वाहिनीची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या भागातील १५२ गावांतील सुमारे १२००० गावकऱ्यांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ मिळत असल्याचा दावाही पाठक यांनी केला.१ हजार दिवसांत १४ हजार गावात वीजज्या गावात वीज पोहचलेली नाही अशा गावांमध्ये वीज जोडणी देण्यासाठीची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार १८ हजार गावांमध्ये वीज पोहचविण्याचे उद्दिष्ट असून, केवळ १ हजार दिवसांत १४ हजार गावांमध्ये वीज पोहचली आहे. येत्या जानेवारीपर्यंत उर्वरित गावांमध्येदेखील वीज पोहोचेल असेही पाठक यांनी यावेळी सांगितले. नंदुरबार आणि गडचिरोलीतील अतिदुर्गम भागात अद्याप वीज पोहोचलेली नाही. तेथेही कामे लवकर सुरू होणार आहेत.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक