मालेगाव : शहरातील पश्चिम भागात कोरोनाचा कहर सुरूच असून रविवारी प्राप्त १२५ अहवालांपैकी ३२ अहवाल पॉझीटीव्ह मिळाले. यात शहरासह ग्रामीण भागातील वडेल व पाटणे येथील रुग्णांचा समावेश आहे. तर २४ पुरुष व ८ महिलांसह ४ व ८ वर्षाच्या दोन मुलांचा समावेश आहे.मिळालेल्या अहवालातील बाधीतांमध्ये नवाहोळी चौकातील ३, चिंधडे गल्ली ४, संगमेश्वरातील मारुती चौकात १, रमजान पुऱ्यात १, सोयगावच्या माऊली चौकातील २, कॅम्पातील पवार गल्लीत १, सटाणा नाका भागात २ तर कॅम्पातील शितलामातानगर भागात १ बाधीत मिळून आला. याशिवाय नानावटी पेट्रोलपंपा जवळ १, चर्च जवळील संभाजी हौसिंग कॉलनी १, कॅम्पातील आदर्शनगर १, कलेक्टरपट्टा भागातील फुले नगर-४, हरिओमनगरात १, बाराबंगला भागात १, सोयगावच्या एकतानगरात १ रुग्ण पॉझीटीव्ह मिळून आले. यासह वडेल, पाटणे, वडनेर खाकुर्डी येथे प्रत्येकी १ बाधीत मिळून आला.
मालेगावच्या पश्चिम भागात ३२ नवे बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 18:53 IST
मालेगाव : शहरातील पश्चिम भागात कोरोनाचा कहर सुरूच असून रविवारी प्राप्त १२५ अहवालांपैकी ३२ अहवाल पॉझीटीव्ह मिळाले. यात शहरासह ग्रामीण भागातील वडेल व पाटणे येथील रुग्णांचा समावेश आहे. तर २४ पुरुष व ८ महिलांसह ४ व ८ वर्षाच्या दोन मुलांचा समावेश आहे.
मालेगावच्या पश्चिम भागात ३२ नवे बाधीत
ठळक मुद्दे २४ पुरुष व ८ महिलांसह ४ व ८ वर्षाच्या दोन मुलांचा समावेश आहे.