नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि.७) एकूण ३१७ रुग्ण कोराेनामुक्त झाले असून २३३ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यात बुधवारी नाशिक ग्रामीणला ४ तर नाशिक शहरात ३ असे एकूण ७ जणांचे मृत्यू झाले असून एकूण बळींची संख्या २००४ वर पोहोचली आहे.नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ११ हजार ८३९ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ८ हजार १३२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १७०३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६९ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.२८, नाशिक ग्रामीण ९५.९८, मालेगाव शहरात ९२.८५, तर जिल्हाबाह्य ९३.९५ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे.
जिल्ह्यात ३१७ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:55 IST