दिंडोरी तालुक्यात एकूण दहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्या केंद्राच्या अंतर्गत येणारे उपकेंद्र व दिंडोरी ग्रामीण रुग्णालय तसेच वणी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू आहे.
आतापर्यंत सर्व फ्रंट वर्कर कर्मचारी, ४५ वयोगटाच्या पुढील नागरिक यांना पहिला व काहींना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दिंडोरी (४८९७), प्राथमिक आरोग्य केंद्र, मोहाडी (४६८५), प्राथमिक आरोग्य केंद्र, पांडाणे (४५३८), प्राथमिक आरोग्य केंद्र, वरखेडा (२३२२), प्राथमिक आरोग्य केंद्र, खेडगाव (१९७६), प्राथमिक आरोग्य केंद्र, उमराळे (१८४६), प्राथमिक आरोग्य केंद्र, वारे (१४१४), प्राथमिक आरोग्य केंद्र, कोचरगाव (१३१६), प्राथमिक आरोग्य केंद्र, ननाशी (१२४९), प्राथमिक आरोग्य केंद्र, निगडोळ (९०५) तसेच ग्रामीण रुग्णालय, दिंडोरी (५५०८) व ग्रामीण रुग्णालय, वणी (२८०) इतक्या लाभार्थींना लस देण्यात आली आहे. वणी येथील ग्रामीण रुग्णलयात कोविड सेंटर असल्याने त्याठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे.
इन्फो
मोहाडी केंद्रावर १९० लाभार्थी
केंद्र सरकारने व राज्य सरकारने १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केले आहे. दिंडोरी तालुक्यात केवळ मोहाडी येथे ज्यांनी ऑनलाइन बुकिंग केली आहे त्यांनाच लस दिली जात आहे. तीन दिवसांत याठिकाणी १९० लाभार्थींना लसीचा लाभ घेतला असल्याची माहिती मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लोणे यांनी दिली.
कोट....
आतापर्यंत फ्रंट लाइन वर्कर व ४५च्या पुढील नागरिकांना लस दिली जात आहे. तसेच १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांना ज्यांनी ऑनलाइन बुकिंग केली आहे त्यांना मोहाडी येथे लसीकरण सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसार तालुक्यात अजूनही केंद्र सुरू करून सर्व लाभार्थींना नियोजन करून लसीकरण मोहीम राबविण्यात येईल.
- डॉ. सुजित कोशिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी