शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

३१ लाखांना आॅनलाइन गंडविणारे त्रिकुट ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:23 IST

नाशिक : लंडनस्थित एका औषधी कंपनीला मेंदूवरील आजाराशी निगडित औषध बनवायचे असून, त्यासाठी लागणाऱ्या ‘जिन्सेन’ नावाच्या औषधी बियांची मागणी होत आहे. अरुणाचलप्रदेशमधील बालाजी एंटरप्रायजेसकडून बियांची खरेदी करण्यास सांगून ३१ लाख २७ हजार रुपयांना गंडा घालणाºया दोघा संशयितांना कांदीवलीमधून तर एकास राजस्थानच्या भीलवाडामधून सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देकांदीवली, राजस्थानमधून अटक : बहुगुणी औषधी बियांच्या खरेदीचा बनाव

नाशिक : लंडनस्थित एका औषधी कंपनीला मेंदूवरील आजाराशी निगडित औषध बनवायचे असून, त्यासाठी लागणाऱ्या ‘जिन्सेन’ नावाच्या औषधी बियांची मागणी होत आहे. अरुणाचलप्रदेशमधील बालाजी एंटरप्रायजेसकडून बियांची खरेदी करण्यास सांगून ३१ लाख २७ हजार रुपयांना गंडा घालणाºया दोघा संशयितांना कांदीवलीमधून तर एकास राजस्थानच्या भीलवाडामधून सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, फेसबुकवर ग्रेस नावाच्या एका स्त्रीच्या प्रोफाइलवरून शहरातील एका राजकीय व्यक्तीला मैत्रीची विनंती पाठविली. त्या व्यक्तीने ती विनंती स्वीकारली आणि नंतर व्हॉट््सअ‍ॅप क्रमांक माहिती करून घेत त्यांच्याशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली. फिर्यादीचा विश्वास जिंकल्यानंतर या व्यक्तीने जॅक्सन, रॉलिन्स, बालाजी त्यागी अशा विविध नावाने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून व्हॉट््सअ‍ॅप व ई-मेलद्वारे संपर्क साधून जवळीक वाढविली. लंडनस्थित हेल्थ केअर नावाच्या औषधी कंपनीला भारतातून जिन्सेन नावाच्या बियांची खरेदी करावयाची आहे. यासाठी नवीन पुरवठादार शोधत असल्याचा बनाव केला. बियांच्या पुरवठ्याच्या मोबदल्यात नफा निम्मा-निम्मा वाटून घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर फिर्यादी यास अरुणाचलप्रदेशच्या बालाजी एंटरप्रायजेसचा पत्ता सांगून तेथून बियांची खरेदी करा म्हणून एक मोबाइलक्रमांक दिला. यानंतर फिर्यादी याने तेथे संपर्क साधला असता एंटरप्रायजेसक डून विविध कारणे सांगितली गेली, मात्र बियांचा पुरवठा झाला नाही, याउलट वेळोवेळी त्या राजकीय व्यक्तीकडून पैसे उकळून सुमारे ३१ लाख २७ हजार रुपयांना संबंधितांनी चुना लावला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्याने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.दहा दिवसांत गुन्'ाचा छडा२ सप्टेंबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरविली. मिळालेल्या सुगाव्यावरून पोलिसांच्या पथकाने कांदीवली गाठले. तेथून अभिषेक रमेश जैन (३३,रा. गणेशनगर, कांदिवली), नितीन प्रभाकर पवार (३८,रा. मुर्गीवाला चाळ, कांदिवली) यांना सर्वप्रथम अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असत्या या दोघांच्या बॅँक खात्यावर रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून राजस्थानच्या भिलवाडामधील तिसºया साथीदाराची माहिती काढली. किशनलाल प्रभू तेली (२६, रा. भगतबाबारोड, दादाबाडी, भिलवाडा) याच्या मुसक्या बांधल्या. या तिघांनी मिळून फेसबुकचा वापर करत फिर्यादी असलेल्या एका राजकीय व्यक्तीला गंडा घातला होता. सायबर पोलिसांनी प्रथमच इतक्या तत्परतेने एखाद्या गुन्'ाचा छडा लावून संशयितांच्या बेड्या ठोकल्या. गुन्हा दाखल होताच दहा दिवसांत उलगडा करण्यास पोलीस यशस्वी झाले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस