शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

दुशिंगपूर शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात ३० मेंढ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 22:57 IST

सिन्नर: तालुक्यातील वावीजवळील दुशिंगपूर शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात ३० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे दहा ते बारा लांडग्यांच्या कळपाने या मेंढ्यांवर हल्ला चढविला

सिन्नर: तालुक्यातील वावीजवळील दुशिंगपूर शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात ३० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.लव्हारे-कसारे, ता. संगमनेर येथील मेंढपाळ बाबासाहेब हरिभाऊ सैंदर हे मेंढ्या चारण्यासाठी दुशिंगपूर शिवारात आले होते. बुधवारी (दि.२) दिवसभर आणि रात्री पाऊस असल्याने सैंदर यांनी त्यांच्या मेंढ्या एका जागी बसविल्या होत्या. रात्री एक वाजेच्या सुमारास दहा ते बारा लांडग्यांच्या कळपाने या मेंढ्यांवर हल्ला चढविला. मेंढ्यांचा आरडाओरडा ऐकू आल्याने सैंदर कुटुंबाने धाव घेतली मात्र १० ते १२ लांडगे असल्याने त्यांचा नाईलाज झाला. या हल्ल्यात ३० मेंढ्या ठार झाल्या. १२ कोकरे व १८ मेंढ्या यात दगावल्या. घटनास्थळी १८ मेंढ्या मृत अवस्थेत आढळून आल्या, तर १२ मेंढ्या लांडग्यांच्या कळपाने ओढून नेल्या. मेंढपाळ सैंदर यांनी दुपारी घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक नारायण वैद्य यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. घटनेची माहिती वावीचे पशुधन विकास अधिकारी अविनाश पवार यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाच जखमी मेंढ्यांवर उपचार केले. या घटनेत सैंदर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.दिवसभरात शंभरावर मेंढ्या मृतसिन्नर तालुक्यात गुरुवार मेंढ्यांसाठी काळा दिवस ठरला. कडाक्याच्या थंडीमुळे जायगाव शिवारात २० व वडगावपिंगळा शिवारात ५२ मेंढ्यांचा गारठून मृत्यू झाला. नांदूरशिंगोटे येथीही थंडीमुळे ४ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. हे ही कमी म्हणून की काय दुशिंगपूर शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात ३० मेंढ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गुरुवारी सिन्नर तालुक्यात मेंढ्यांवर संक्रांत आल्याचे दिसून आले. जवळपास दिवसभरात १०६ मेंढ्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Malegaonमालेगांवforestजंगल