शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ३० गावांचा पाणीप्रश्न मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:23 IST

इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा लघुपाटबंधारे योजनांना औरंगाबादच्या जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनांमुळे आदिवासी भागातील ३० गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. यामुळे तीन हजार ४६० हेक्टर क्षेत्र यामुळे पाण्याखाली येणार आहे.

ठळक मुद्देसहा लघुपाटबंधारे योजनांना मंजुरी

त्र्यंबकेश्वर/घोटी : इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा लघुपाटबंधारे योजनांना औरंगाबादच्या जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनांमुळे आदिवासी भागातील ३० गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. यामुळे तीन हजार ४६० हेक्टर क्षेत्र यामुळे पाण्याखाली येणार आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव, राऊतमाळ, खडकओहोळ, वरसविहीर, कळमुस्ते, खोरीपाडा (गोलदरी) या लघुपाटबंधारे योजनांना जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सर्व योजनांसाठी लाखोंची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे वावी हर्ष, टाके देवगाव, बर्ड्याची वाडी, राऊतमाळ, शिरसगाव, जांभूळपाडा, कामतपाडा, भूतमोखाडा, खडकओहोळ, ओझरखेड, विराचा पाडा, भूतारखेत, गोलदरी, देवडोंगरा, देवडोंगरी, बाफनविहीर, वरसविहीर, खरवळ, वीरनगर, नांदगाव कोहळी, आडगाव देवळा, बटक पाडा, कळमुस्ते, दुगारवाडी, उंबर्डे आदी २५ ते ३० गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, मंत्री राम शिंदे यांना आमदार निर्मला गावित यांनी दुर्लक्षित आणि मागास असणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्याबाबत अधिक माहिती दिली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, कुपोषण, स्थलांतर कमी होण्यासाठी या योजना उपयोगी ठरतील.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिकGovernmentसरकार