शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विरोध करणाऱ्या ३० आंदोलकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 01:14 IST

पुनंद प्रकल्पातून जाणाºया सटाणा नगर परिषदेच्या जलवाहिनी योजनेच्या कामाला शुक्रवारी (दि. २८) सकाळी पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाल्याने या योजनेला विरोध करण्यासाठी जाणाºया जयदर येथील पुनंद प्रकल्प जलवाहिनी विरोधी कृती समितीच्या ३० कार्यकर्त्यांना अभोणा पोलिसांनी अटक केली.

कळवण : पुनंद प्रकल्पातून जाणाºया सटाणा नगर परिषदेच्या जलवाहिनी योजनेच्या कामाला शुक्रवारी (दि. २८) सकाळी पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाल्याने या योजनेला विरोध करण्यासाठी जाणाºया जयदर येथील पुनंद प्रकल्प जलवाहिनी विरोधी कृती समितीच्या ३० कार्यकर्त्यांना अभोणा पोलिसांनी अटक केली. दरम्यान या योजनेला विरोध म्हणून शनिवारी (दि.२९) कृती समिती व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कळवण बंदची हाक दिली आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात योजनेच्या कामास सकाळी १० वाजता सुरु वात झाल्याचे समजताच पिंपळे बु ।।, सिद्धेश्वर मार्गे गनिमी काव्याने धाव घेणाºया नेते व कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या नाकेबंदीमुळे जयदर मार्गे जाण्याचा घेण्याचा प्रयत्न केला.जयदर पाटबंधारे वसाहतजवळून पुनंदकडे जलवाहिनी विरोधी घोषणा देत जाणाºया कार्यकर्त्यांना अभोणा पोलिसांनी चौफुलीवर अडवून पुनंदकडे जाण्यास मज्जाव केला. तालुक्यात टप्प्याटप्प्याने साखळी आंदोलन करून जनतेचा विरोध न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला जाणार आहे.  यावेळी कृती समितीचे अध्यक्ष देविदास पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार ,शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी जलवाहिनीला विरोध दर्शविला. मुंबई उच्च न्यायालयाने योजनेच्या कामात व्यत्यय व विरोध करणाºया व्यक्ती विरोधात प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याने न्यायालयीन कामकाजात अडथळा आणू नका व न्यायालयाचा अवमान करू नका अशी विनंती अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी आंदोलकांना केली. आंदोलक पुनंदकडे धाव घेण्यासाठी घोषणाबाजी करत असताना अभोणा पोलिसांनी देविदास पवार , नितीन पवार , कारभारी आहेर, राजेंद्र भामरे ,अंबादास जाधव ,महेंद्र हिरे हेमंत पाटील , शांताराम जाधव ,अण्णा पाटील ,मोहन जाधव ,बाळासाहेब शेवाळे ,जितेंद्र वाघ , विलास रौंदळ, संदीप वाघ ,मुन्ना वाघ ,रामा पाटील ,देसराण्याचे महेंद्र हिरे ,प्रवीण रौंदळ ,पंकज जाधव ,े पंकज जाधव ,गंगाधर शेवाळे ,काशिनाथ गुंजाळ ,मोहन जाधव ,दादाजी बोरसे ,हेमंत पगार ,संजय मोरे ,दिलीप शिंदे ,रमेश जाधव आदीसह ३० जणांना अटक करून अभोणा पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केले व सायंकाळी सोडून दिले.बैठकीत आंदोलनाची दिशाकळवण येथील शासकीय विश्रामगृहावर कृती समतिी ,नेते व सर्वपक्षीय पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन त्यात कळवण तालुक्यात निर्माण झालेली पाणी परिस्थिती ,पाणी पळविण्याचे राजकारण ,न्यायालयातील धाव ,लोकप्रतिनिधी यांची अनास्था , तालुक्यातील जनतेची एकजूट व आंदोलन करण्याबाबत भूमिकाबाबत चर्चा झाली. कळवण तालुक्यात जलवाहिनी योजनेविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.सोमवारी होणार बैठकपुनंद प्रकल्प जलवाहिनीयोजनेला विरोध म्हणून शनिवारी (दि.२९) कृती समिती, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून कळवण बंदची हाक देण्याची आली आहे. शनिवारी व रविवारी तालुक्यात गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करण्यात येणार असून, सोमवार, दि.१ जुलै रोजी कळवण येथे लाभक्षेत्रातील शेतकरी व आदिवासीबांधवांची संयुक्त बैठक घेऊन जलवाहिनी विरोधी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.त्यानंतर तालुक्यात टप्प्याटप्प्याने साखळी आंदोलन करून तालुक्यातील जनतेचा असलेला विरोध शासनाच्या व न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला जाणार असल्याचे पुनंद प्रकल्प जलवाहिनी विरोधी कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :DamधरणWaterपाणी