शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

मनपा कर्मचाऱ्यांना तीस लाखांचे गृहकर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:39 IST

नाशिक महापालिकेत फिक्स पे म्हणजे निश्चित वेतनावर काम करणाºया सर्व सफाई कर्मचाºयांना वेतनश्रेणीवर घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना आणि कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत घेतला.

नाशिक : नाशिक महापालिकेत फिक्स पे म्हणजे निश्चित वेतनावर काम करणाºया सर्व सफाई कर्मचाºयांना वेतनश्रेणीवर घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना आणि कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत घेतला. सोळा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घर कर्जाचा विषय मार्गी लागली असून, वाढत्या घरांच्या किमती बघता आता तीस लाख रु पयांपर्यंत गृहकर्ज तर सत्तर हजार वाहन कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. आर्थिक गैरव्यवहाराव्यतिरिक्त कर्मचाºयांना यापुढे सरळ निलंबनाची कार्यवाही न करता आधी समज देण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. अनेक मागण्या मान्य झाल्याने कामगार कृती समितीने समाधान व्यक्त केले असून, कृती समितीतून बाहेर पडणाºया संघटनांची मात्र चांगलीच गैरसोय झाली आहे, अशी कोपरखळी सेनेने उडविली आहे.  महापालिकेतील कर्मचाºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करीत कामगार संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाने संपावर न जाता चर्चेचे आमंत्रण म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेला दिले होते. सोमवारी (दि.२०) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.  या बैठकीत म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण तिदमे, माजी महापौर अशोक दिवे, सुरेश मारू, अनिल बहोत, प्रकाश अहिरे यांच्यासह प्रशासनातर्फे उपायुक्त महेश बच्छाव, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, आर. एम. बहिरम, मुख्यलेखाधिकारी डॉ. सुहास शिंदे, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी आणि खाते प्रमुखांनी चर्चेत सहभाग घेतला.  या बैठकीत कर्मचाºयांना घर कर्ज, वाहन कर्ज मर्यादेत वाढ करण्यावर आयुक्तांनी सहमती दर्शवून मान्य करून आता वेतनाच्या दोनशे पट किंवा जास्तीत जास्त तीस लाख रु पयांचे घर कर्ज देण्यास मंजुरी दिली. रोस्टर आणि बिंदू नामावलीचे काम पूर्ण करून दिवाळीपर्यंत पदोन्नती आणि कर्मचारी भरतीचा निर्णय घेण्याचे आयुक्तांनी मान्य केले. आर्थिक गैरव्यवहार वगळता कर्मचाºयांवर अन्य कारणांसाठी त्वरित निलंबन न करता प्रथम समज देण्याचेही आयुक्तांनी मान्य केले. कामगार कल्याण निधीतून वैद्यकीय भत्त्यात विलीनीकरण करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला ताराचंद पवार, सतीश टाक, रवि कटारे, प्रकाश उखाडे, विजय गवारे, आशा मुठाळ, रमाकांत क्षीरसागर, श्याम काळे, चंद्रशेखर दातरंगे, तुषार देशमुख, सोमनाथ कासार, रवि येडेकर, अंकेश चव्हाण आणि मनपा खातेप्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका