शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

पंचवटीत ३० आजी - माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात

By admin | Updated: January 10, 2017 01:17 IST

समोरासमोर निवडणूक लढविण्याची शक्यता

संदीप झिरवाळ पंचवटीआगामी महापालिका निवडणुकीसाठी पंचवटी विभागातील प्रत्येक प्रभागात आजी-माजी असे एक ते दोन लोकप्रतिनिधी इच्छुक असल्याने महापालिका निवडणुकीच्या रिंगणात जवळपास ३० आजी-माजी नगरसेवक उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही प्रभागांत दोन विद्यमान नगरसेवक एकमेकांसमोर ठाकणार आहेत. पंचवटीत पूर्वी बारा प्रभाग होते. प्रत्येक प्रभागात दोन सदस्य याप्रमाणे २४ लोकप्रतिनिधी होते. नवीन प्रभाग रचनेनुसार आता चार जागांचा एक प्रभाग झाल्याने पंचवटीत सदस्य संख्या पूर्वीप्रमाणेच २४ असून, सहा प्रभाग झाले आहे. पंचवटी विभागात सध्या शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस असे २४ नगरसेवक आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींमध्ये सध्या विद्यमान महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, अ‍ॅड. राहुल ढिकले, रंजना भानसी, उद्धव निमसे, लता टिळे, ज्योती गांगुर्डे, समाधान जाधव, कविता कर्डक, विमल पाटील, मनीषा हेकरे, दामोदर मानकर, परशराम वाघेरे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, तर माजी नगरसेवकात अरुण पवार, अ‍ॅड. जे. टी. शिंदे, सुरेश खेताडे, उल्हास धनवटे, भगवान भोगे, शरद सानप, कमलेश बोडके, संजय बागुल, पुंडलिक खोडे, डॉ. जगन्नाथ तांदळे, रुक्मिणी कर्डक, हरिभाऊ लासुरे हेदेखिल निवडणुकीत नशीब आजमाविणार आहेत. विद्यमान नगरसेवकात गणेश चव्हाण हे पत्नीला, तर डॉ. विशाल घोलप हे आईला, मीना माळोदे यांचे पती, तर फुलावती बोडके यांच्याऐवजी त्यांचे पुत्र माजी नगरसेवक कमलेश बोडके, रूपाली गावंड यांचे पती हेमंत शेट्टी असे निवडणूक रिंगणात आहे. पंचवटीत जवळपास दीड डझनपेक्षा अधिक विद्यमान, तर डझनभर माजी नगरसेवक असे ३० आजी-माजी लोकप्रतिनिधी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.