शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

जिल्ह्यात ११ महिला उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 00:55 IST

नाशिक : जिल्ह्यातील आजवर नऊ महिला उमेदवारांनी विधानसभा गाठलेली आहे. त्यातील पुष्पाताई हिरे यांनी दाभाडी मतदारसंघातून चारवेळा बाजी मारलेली आहे. यंदाही निवडणुकीत ११ महिला उमेदवार नशीब आजमावित असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा महिला उमेदवारांची संख्या घटली आहे. हे प्रमाण अवघे सात टक्के इतके आहे. २०१४ च्या निवडणुकीत १५ महिला उमेदवार रिंगणात होत्या.

ठळक मुद्दे संख्या घटली : आजवर नऊ महिलांनी गाठली विधानसभा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील आजवर नऊ महिला उमेदवारांनी विधानसभा गाठलेली आहे. त्यातील पुष्पाताई हिरे यांनी दाभाडी मतदारसंघातून चारवेळा बाजी मारलेली आहे. यंदाही निवडणुकीत ११ महिला उमेदवार नशीब आजमावित असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा महिला उमेदवारांची संख्या घटली आहे. हे प्रमाण अवघे सात टक्के इतके आहे. २०१४ च्या निवडणुकीत १५ महिला उमेदवार रिंगणात होत्या.राजकारणात महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सहभाग नोंदवित आलेल्या आहेत. काही महिलांनी तर सत्तेत महत्त्वाची खाती सांभाळत आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवून दिलेली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत १५ महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यात बागलाण मतदारसंघात सर्वाधिक सहा उमेदवारांचा समावेश होता. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी पाच महिला उमेदवारांना संधी दिली होती. त्यापैकी बागलाणमधून दीपिका चव्हाण, नाशिक मध्यमधून प्रा. देवयानी फरांदे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे आणि इगतपुरीतून निर्मला गावित यांनी विजयश्री प्राप्त केली होती.२०१४ मध्ये मोदी लाटेतही कॉँग्रेस-राष्टÑवादीने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. आता विधानसभा निवडणुकीत ११ महिला उमेदवार रिंगणात आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या घटली आहे.यंदा इगतपुरीतून शिवसेनेकडून निर्मला गावित, अपक्ष शैला झोले, बागलाणमधून राष्टÑवादीकडून दीपिका चव्हाण आणि अपक्ष अंजनाबाई मोरे, नाशिक पूर्वमधून अपक्ष भारती मोगल, नाशिक मध्यमधून भाजपच्या देवयानी फरांदे आणि कॉँग्रेस आघाडीच्या डॉ. हेमलता पाटील, नाशिक पश्चिममधून भाजपच्या सीमा हिरे व बहुजन विकास आघाडीच्या मनीषा साळुंखे, देवळालीतून राष्टÑवादीच्या सरोज अहिरे, तर मालेगाव मध्यमधून भाजपच्या दीपाली वारुळे या उमेदवारी करीत आहेत.निफाड, दिंडोरी, कळवण-सुरगाणा, चांदवड, मालेगाव बाह्य, येवला आणि नांदगाव या मतदारसंघांत एकही महिला उमेदवार नाही. मागील निवडणुकीत निवडून गेलेल्या चारही महिला आमदार यंदा पुनश्च नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील विजयी महिला उमेदवार वर्ष मतदारसंघ उमेदवार१९६७ सिन्नर रुक्मिणी वाजे१९७२ मालेगाव आयेशा हकीम१९८५ दाभाडी पुष्पाताई हिरे१९९० दाभाडी पुष्पाताई हिरे१९९५ दाभाडी पुष्पाताई हिरे१९९९ निफाड मंदाकिनी कदम१९९९ दाभाडी पुष्पाताई हिरे२००४ नाशिक डॉ. शोभा बच्छाव२००९ इगतपुरी निर्मला गावित२०१४ बागलाण दीपिका चव्हाण२०१४ नाशिक मध्य देवयानी फरांदे२०१४ नाशिक पश्चिम सीमा हिरे२०१४ इगतपुरी निर्मला गावित

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक