शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:01 IST

:संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठाभावली शंभर टक्के आणि दारणा ८७ टक्के भरले आहे. दरवर्षी वेळेत येऊन धरणे भरवणाऱ्या पावसाने यंदा ओढ दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस नव्हता. मात्र जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे साठा वाढू लागला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान अद्यापही झाले नाही.

नाशिक :संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के साठाभावली शंभर टक्के आणि दारणा ८७ टक्के भरले आहे.दरवर्षी वेळेत येऊन धरणे भरवणाऱ्या पावसाने यंदा ओढ दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस नव्हता. मात्र जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे साठा वाढू लागला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान अद्यापही झाले नाही. अन्यत्र मात्र पावसाची रिपरिप सुरूच आहे. इगतपुरीत गेल्या चोवीस तासांत १२६ तर त्र्यंबकेश्वरमध्ये १७२ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. त्यामुळे गंगापूर, दारणा आणि भावली या धरणांचा जलसाठा वाढत आहे. दारणामधून आज सकाळी सहा वाजता १६ हजार ५९८ तर भावलीमधून १ हजार २१८ क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला. तसेच निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाºयातूनदेखील पाण्याचा विसर्ग केला जात आहे.गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत एकूण ४४१ मिमी इतका पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस त्र्यंबकेश्वरमध्ये १७२ तर अंबोलीत ९२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ४७७ दलघफूपर्यंत नव्याने पाण्याची आवक गंगापूर धरणात होऊन धरण ७४.३५ टक्के भरले. या समूहातील कश्यपी ४८ तर गौतमी गोदावरी ५८ टक्के भरले आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत गंगापूर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणसाठा ८० टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो. त्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन जलसंपदा विभागाकडून गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेचशुक्र वारपासून नाशिक शहरातदेखील मध्यम सरींची संततधार सुरू असल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली आहे. पहाटेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत शहरात संततधार सुरू होती. गेल्या चोवीस तासांत शहरात १७ मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला.पाणीकपात रद्दबाबत आज निर्णय शक्यगंगापूर धरणात पुरेसा साठा नसल्याने गेल्या ३० जूनपासून शहरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होतो त्याठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला असून, संपूर्ण शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. महापौर रंजना भानसी यांनी गंगापूर धरणासाठी साठा ८० टक्के झाल्यानंतर पाणीकपात रद्द करू, असे जाहीर केले होते. आता जवळपास ८० टक्के साठा होईल, अशी स्थिती आहे. सोमवारी (दि.२९) याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे आढावा बैठक होणार असून, त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसgangapur damगंगापूर धरण