लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : येथील सटाणारोडवरील जनलक्ष्मी बॅँकेच्या कॅश काऊंटर कॅबिनमधुन भरदिवसा दोन अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ९२ हजारांची रोकड चोरुन नेली. सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बॅँकेचे व्यवस्थापक किरण परशराम वाघ यांनी छावणी पोलीसात फिर्याद दिली. सोमवारी बॅँकेच्या कॅश क्लोझींगच्या वेळी भरण्यात रक्कम कमी आल्याने मुख्य शाखेचे प्रशासन अधिकारी यांनी सीसीटीव्हीचे फुटेज पाहून चोरी झाल्याची खात्री झाल्याने बुधवारी रात्री त्यांनी पोलीसात फिर्याद दिली. दोन अनोळखी चोरट्यांपैकी एकाने टोपी घातली असून त्यांनी ही रक्कम चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
जनलक्ष्मी बॅँकेतुन ३ लाख ९२ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 19:14 IST