शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

‘कॅट्स’मधून २९ वैमानिक देशसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:34 IST

भारतीय सैन्य दलाचा कणा मानल्या जाणाऱ्या ‘कॅट्स’च्या तळावरून लढाऊ वैमानिकांच्या ३१व्या तुकडीचे २९ वैमानिक, सहा प्रशिक्षक देशसेवेत दाखल झाले. दिमाखदार सोहळ्यात वैमानिक व प्रशिक्षकांना ‘एव्हिएशन विंग’ व ‘एव्हिएशन इन्स्ट्रक्टर बॅज’ प्रदान करण्यात आले.

नाशिक : भारतीय सैन्य दलाचा कणा मानल्या जाणाऱ्या ‘कॅट्स’च्या तळावरून लढाऊ वैमानिकांच्या ३१व्या तुकडीचे २९ वैमानिक, सहा प्रशिक्षक देशसेवेत दाखल झाले. दिमाखदार सोहळ्यात वैमानिक व प्रशिक्षकांना ‘एव्हिएशन विंग’ व ‘एव्हिएशन इन्स्ट्रक्टर बॅज’ प्रदान करण्यात आले.गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’चा (कॅट्स) दीक्षांत सोहळा शनिवारी (दि. ११) पार पडला. युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, भूदलाला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षितपणे उपचारार्थ तत्काळ हलविणे आदी बाबींचे शास्त्रशुद्ध सैनिकी लढाऊ हेलिकॉप्टर चालनाचे प्रशिक्षण या केंद्रातून प्रशिक्षणार्थींना देण्यात आले. वैमानिकांचा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी स्कूल आॅफ आर्टिलरी, देवळालीचे लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग सलारिया होते.चित्ता, चेतक, धु्रव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने व चित्तथरारक युद्ध प्रात्यक्षिकांनी रंगलेला ‘कॅट्स’च्या दीक्षांत सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सैनिकी ब्रास बॅण्ड पथकाच्या तालावर प्रशिक्षणार्थी जवानांनी परेड सादर करत लष्करी अधिकाऱ्यांना ‘सॅल्यूट’ केला.३२ वर्षांची वैभवशाली कामगिरीप्रशिक्षण कालावधीत आपल्या कौशल्यपूर्ण अशा उत्कृष्ट कामगिरीबद्दल कॅप्टन अंकित मलिक यांना मानाची ‘सिल्व्हर चित्ता’, मेजर प्रभप्रित सिंग यांना ‘मेजर प्रदीप अग्रवाल’ स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. येथील केंद्राने आपल्या प्रशिक्षण कालावधीची ३२ वर्षे पूर्ण केली असून, ३३व्या वर्षात पदार्पण केले आहे. या कालावधीत अनेक प्रशिक्षित कौशल्यधिष्ठित लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांच्या तुकड्या येथून घडविल्या गेल्या आहेत. ‘कॅट्स’चा इतिहास वैभवशाली राहिला आहे.‘आॅपरेशन विजय’युद्धजन्य परिस्थितीत लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची असलेली भूमिका ‘आॅपरेशन विजय’च्या प्रात्यक्षिकामधून उपस्थितांनी बघितली. ‘चित्ता’मधून रसदचा पुरवठा होताच सैनिकांनी शत्रूच्या दोन्ही तळांवर जोरदार हल्ला चढवून अवघ्या काही क्षणात त्यांच्या छावण्या उद्ध्वस्त केल्या. अल्पावधीत शत्रूवर विजय मिळविताच सैनिकांनी तिरंगा फडकावून सलामी दिली. जखमी झालेल्या सैनिकांना पुन्हा ‘चेतक’च्या सहाय्याने तत्काळ रुग्णालयात हलविण्यात येते. या युद्धजन्य प्रात्यक्षिक सोहळ्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.धाडस व कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक यशस्वी होतो. ‘एव्हिएशन स्कूल’चे उत्तम व्यासपीठ आहे. या केंद्राचा गौरवशाली इतिहास राहिलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कौशल्यपूर्ण वैमानिक येथून सातत्याने घडविले जात आहेत. शारीरिक व मानसिक आरोग्य एका उत्कृष्ट लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकासाठी आवश्यक ठरते.- लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग सलारिया,कमांडंट, स्कूल आॅफ आर्टिलरी

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिक