शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

२८१ तळघरांचा अनधिकृत वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:23 IST

महापालिकेने अनधिकृत मंगल कार्यालये व लॉन्सपाठोपाठ आता तळघरांचा अनधिकृतपणे वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईची तयारी चालविली असून, नगररचना विभागाने २८१ ठिकाणांची यादी कारवाईसाठी अतिक्रमण विभागाकडे रवाना केली आहे. आता अतिक्रमण विभागाच्या कारवाईकडे लक्ष लागून असणार आहे.

नाशिक : महापालिकेने अनधिकृत मंगल कार्यालये व लॉन्सपाठोपाठ आता तळघरांचा अनधिकृतपणे वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईची तयारी चालविली असून, नगररचना विभागाने २८१ ठिकाणांची यादी कारवाईसाठी अतिक्रमण विभागाकडे रवाना केली आहे. आता अतिक्रमण विभागाच्या कारवाईकडे लक्ष लागून असणार आहे.  महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील १६३ मंगल कार्यालये व लॉन्स यांना अनधिकृत बांधकाम व विनापरवाना वाणिज्य वापर केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या आहेत. त्यावर कारवाईची तयारी सुरू असतानाच आता नगररचना विभागाने इमारतीतील तळघरांचा अनधिकृत वापर करणाºया व्यावसायिकांची यादी तयार करत कारवाईसाठी ती अतिक्रमण विभागाकडे पाठविली आहे. नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात २८१ ठिकाणी तळघरांचा अनधिकृत वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात १०४ ठिकाणी गुदामे असून, २५ ठिकाणी हॉटेल थाटण्यात आली आहेत. याशिवाय १०५ ठिकाणी विविध प्रकारची दुकाने सुरू आहेत, तर ४७ ठिकाणी अन्य व्यवसाय चालतात. पंचवटी विभागात सर्वाधिक ९९ ठिकाणी तळघरांचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर महासभेत भाषण करताना तळघरातील अतिक्रमणांसह टेरेसवरील अनधिकृत वापरावर चाप लावण्याचे सूतोवाच केले होते. तळघरातील अनधिकृत वापराबद्दलची कारवाई महापालिकेच्या मुख्यालयासमोर असलेल्या इमारतींपासूनच करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. आता नगररचना विभागाने अतिक्रमण विभागाकडे यादी रवाना केल्यानंतर आयुक्तांच्या केलेल्या भाषणानुसार, कधी आणि कुठून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू होते, याकडे लक्ष लागून असणार आहे.टेरेसचा अनधिकृत वापरतळघरातील अनधिकृत वापराबरोबरच महापालिकेच्या नगररचना विभागाने इमारतीच्या टेरेसवर थाटलेल्या अनधिकृत वापराबाबतही सर्वेक्षण करत यादी तयार केलेली आहे. त्यात २१ ठिकाणी टेरेसवर हॉटेल, तर १२ ठिकाणी गुदामे थाटण्यात आली असून, नऊ ठिकाणी अन्य वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतही महापालिकेने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यातील काही हॉटेलचालकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले असले तरी बºयाच जणांनी आपले बांधकाम कायम ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका