शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: पहिल्याच सभेत फडणवीसांनी काढली मनातली भडास, ज्युनिअर ठाकरेंनाही सोडलं नाही! काय म्हणाले?
2
Eknath Shinde: 'मुंबईचा महापौर मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ' वरळीतील सभेत एकनाथ शिंदे कडाडले!
3
Kim Jong Un : "माझे मित्र मादुरो यांना तातडीने सोडा, अन्यथा..."; अमेरिका-व्हेनेझुएला संघर्षात किम जोंग उनची एन्ट्री
4
सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक! रश्मी शुक्ला यांच्याकडून स्वीकारला पदभार
5
उद्धवसेनेच्या उमेदवारास 'मशाल' चिन्ह नाकारले; निवडणूक अधिकारी- दानवे समोरासमोर
6
ऑपरेशन सिंदूरचा धसका, ब्रह्मोसला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून 'तैमूर' मिसाईलची चाचणी
7
"अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे..."; Viral Video वरून काँग्रेसची टीका
8
Hyderabad: मुलांसोबत तलावाजवळ गेली अन्...; आईचं भयानक कृत्य, नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली!
9
हलगर्जीपणाचा कळस! दीडवर्ष असह्य वेदना; ऑपरेशन करताना पोटात विसरले कात्री, महिलेचा मृत्यू
10
Smartphone: थेट ब्लॅकबेरी आणि आयफोनशी स्पर्धा? धमाकेदार अँड्राईड फोन बाजारात, कुणी केला लॉन्च?
11
पालघरजवळच्या खाडीत सहा-सात बगळे मृत अन् अर्धमेल्या अवस्थेत! संसर्ग की घातपात, चर्चांना उधाण
12
Donald Trump : "आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
13
IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती
14
"ते तर आता 'लीडर ऑफ पर्यटन'"; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका
15
टीम इंडियासाठी 'गुड न्यूज'! Shreyas Iyerला 'कमबॅक'साठी BCCIची मान्यता, 'या' तारखेला खेळणार
16
बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक
17
Tarot Card: स्वामींचं नाव घेत एक कार्ड निवडा आणि पुढच्या आठवड्याचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या
18
हिवाळ्यात नारळ पाणी प्यावं की नाही? लोक हमखास करतात चूक, विसरु नका ‘ही’ योग्य वेळ
19
सोलापूर: निवडणुका बिनविरोध करण्यासाठीच 'तो' मर्डर! प्रणिती शिंदेंचा भाजपावर गंभीर आरोप
20
अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात, भरधाव दुचाकीस्वाराने दिली धडक; पत्नीही जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात २५ हजार अ‍ॅँटिजेन टेस्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:31 IST

नाशिक : ‘मिशन झिरो’अंतर्गत गत पंधरवड्यापासून सुरू असलेल्या अभियानात आतापर्यंत तब्बल २५ हजार अ‍ॅँटिजेन टेस्टचे ध्येय पूर्ण करण्यात आले. या टेस्टच्या माध्यमातून आतापर्यंत महानगरातील २७८० पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यात यश आले आहे. त्यामुळे या बाधितांच्या माध्यमातून अजून पुढे होणारा प्रसार वेळीच रोखणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देपुढाकार : ‘मिशन झिरो नाशिक’ अभियानास पंधरा दिवस पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘मिशन झिरो’अंतर्गत गत पंधरवड्यापासून सुरू असलेल्या अभियानात आतापर्यंत तब्बल २५ हजार अ‍ॅँटिजेन टेस्टचे ध्येय पूर्ण करण्यात आले. या टेस्टच्या माध्यमातून आतापर्यंत महानगरातील २७८० पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यात यश आले आहे. त्यामुळे या बाधितांच्या माध्यमातून अजून पुढे होणारा प्रसार वेळीच रोखणे शक्य झाले आहे.नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांचे वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन झिरो नाशिक’ या एकात्मिक कृती योजनेस पंधरा दिवस पूर्ण झाले आहेत. या अभियानांतर्गत रविवारपर्यंत २५०३३ अ‍ॅँटिजेन टेस्ट करून २७८० बाधितांना शोधण्यात यश आले आहे. लक्षणे असलेल्या तसेच वयस्कर व इतर आजारी असलेल्या नेमक्या व्यक्तींची तपासणी होत असल्याने पॉझिटिव्ह रु ग्णांना हुडकून काढण्यात यश येत आहे. त्यामुळे उपचार करणे, आयुर्वेदिक काढा देणे, त्यायोगे रु ग्णांमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांना शारीरीक व मानसिक बळ देण्यात हे अभियान यशस्वी होत आहे. रविवारी केवळ रविवार कारंजा गणपती मंदिर या ठिकाणी तपासणी व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली होती. अन्य सर्व मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅन निर्जंतुकीकरण करण्याकरिता रविवारी पाठवण्यात आल्याने आता पुन्हा सोमवारपासून कामकाजाला पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. ‘मिशन झिरो नाशिक’मध्ये महानगरपालिकाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, पोलीस आयुक्तालय, भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते यांच्या बरोबरीने सैफी अ‍ॅम्बुलन्स कॉर्पसचे सेवाभावी कार्यकर्ते, गुरु द्वारा नाशिकरोड, किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, एसकेडी इंटरनॅशनल स्कूल, व्हिजन अकॅडमी, साधना फाउंडेशन, मातोश्री ट्रॅव्हल्स, इस्पलियर स्कूल, डॉक्टर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निसिएन, शिक्षक, स्थानिक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अशा अनेक संस्था व व्यक्ती यांचे सहकार्य लाभत आहे.२२५ जणांचे सांघिक कार्यमहानगरातील विविध भागांतून तब्बल २४ मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे हे कार्य केले जात आहे. त्यामुळेच अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून सेवा पुरवण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना व कार्यकर्त्यांना यश आले आहे. मिशन झिरो नाशिकसाठी महानगरातील २२५हून अधिक कर्मचारी व कार्यकर्त्यांची टीम कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातूनच हे दैनंदिन जनसेवेचे कार्य पुढे नेणे शक्य होत असल्याचे भारतीय जैन संघटना आणि मिशन झिरोचे समन्वयक नंदकिशोर सांखला यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल