शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२४ हजार किलोमीटरच्या सायकल भ्रमंतीमध्ये जागोजागी भेटला ‘माणूस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 22:32 IST

गंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सन्मान व संवाद’ या कार्यक्र मात गुप्ता बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देजगात सर्वसामान्यांमध्ये धर्म, जात, पंथ असा भेदभाव जाणवला नाहीम्हणून भारताची प्रतिमा मलिनअनेक मुस्लीम देशात स्त्री-पुरु ष समानता

नाशिक : सायकलवरुन ३१ देशांच्या भ्रमंतीसाठी सायकलवरुन निघालो असताना जगात सर्वसामान्यांमध्ये धर्म, जात, भाषा, पंथ, लिंग असा कोणताही भेदभाव जाणवला नाही तर माणुसकीच श्रेष्ठ असल्याचा अनुभव मला आला. या सहाशे दिवसांच्या सायकलभ्रमंतीमध्ये मला सच्चा माणूस जागोजागी भेटला. ही भ्रमंती थरारक जरी असली तरी माझ्या आंतरबाह्य बदलाची साक्षीदारही आहे, असे २४ हजार किलोमीटरचे अंतर सायकलवरुन पुर्ण करणाऱ्या देवळाली गावातील योगेश गुप्ता यांनी सांगितले.गंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सन्मान व संवाद’ या कार्यक्र मात गुप्ता बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संजय पाटील, निता नारंग, विनायक रानडे, जयेश आपटे, मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहशे दिवसांची सायकलभ्रमंती व त्यामध्ये आलेले अनुभव याबाबत संवादक अपर्णा क्षेमकल्याणी यांनी योगेश गुप्ता यांच्याशी दिलखुलास गप्पा मारत विविध पैलू उपस्थितांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुप्ता म्हणाले, सायकलवर तंबू, स्लिपिंग बॅग, दोन जोडी कपडे व सायकल दुरु स्तीचे सामान घेऊन घराबाहेर पडलो. खरे जीवन अनुभवण्याकरिता महामार्गाची निवड न करता आडवाटेचा मार्ग निवडला. सर्वच ठिकाणी स्थानिकांचे खूप सहकार्य मिळाले तसेच आपुलकीमुळे माझा प्रवास सोपा झाला आणि एक वेगळीच अनुभूती मिळाली. कोणत्याही देशातील सामान्य नागरिकांना युद्ध नको असल्याचे सांगताना अनेक मुस्लीम देशात स्त्री-पुरु ष समानता पहावयास मिळाल्याचे गुप्ता यांनी आवर्जून यावेळी नमुद केले.-इन्फो-...म्हणून भारताची प्रतिमा मलिनइराणचे नागरिक अत्यंत स्वागतशील असून तेथे भेटलेल्या एका व्यक्तीने तर चक्क त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मागणी घातली आणि ते बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. अनेक देशांमध्ये आजही जुने हिंदी चित्रपटांची गीते लोकिप्रय आहेत. माध्यमांतून येणाºया भारतातील हिंसाचार, बलात्कार, असुरक्षितता, अस्वच्छता, जातीय तेढ आदि बातम्यांमुळे भारताची प्रतिमा विदेशात जनसामान्यात नकारात्मक होत असल्याची खंत त्यांनी अनुभव सांगताना व्यक्त केली.

टॅग्स :Travelप्रवासNashikनाशिक