शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीनंतरही २४ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:49 IST

अनुसूचित जाती-जमाती कुटुंबातील व्यक्तींची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने महात्मा फुले मागास विकास महामंडळाच्या नाशिक कार्यालयातर्फे २ हजार ४३९ लाभार्थींना कर्जमाफी मिळाल्यानंतरही जवळपास २४ कोटींची कर्जवसुली थकीत असून, गेल्या वर्षभरात त्यापैकी केवळ १४ लाख रुपयांची वसुली होऊ शकली आहे.

नाशिक : अनुसूचित जाती-जमाती कुटुंबातील व्यक्तींची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने महात्मा फुले मागास विकास महामंडळाच्या नाशिक कार्यालयातर्फे २ हजार ४३९ लाभार्थींना कर्जमाफी मिळाल्यानंतरही जवळपास २४ कोटींची कर्जवसुली थकीत असून, गेल्या वर्षभरात त्यापैकी केवळ १४ लाख रुपयांची वसुली होऊ शकली आहे. महामंडळाच्या कर्जवसुलीस अल्प प्रतिसाद मिळत असतानाही महामंडळाकडून नव्याने १०४ प्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याने महामंडळाच्या कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.  महात्मा फुले मागास वित्त व विकास महामंडळामार्फत करण्यात आलेल्या कर्जमाफीनंतरही २००८ पासून सुमारे ७७० लाभार्थींकडे तीन कोटी ६८ लाख रुपयांच्या कर्जाची थकबाकी आहे, तर १ एप्रिल २००८ नंतर सुमारे २ हजार ५५९ लाभार्थींना १९ कोटी २० लाख रुपयांच्या कर्जांचे वितरण करण्यात आले आहे. या कर्जांच्या वसुलीला अतिशय अल्प प्रतिसाद मिळत असून, कर्जांच्या स्वरूपात वितरित करण्यात आलेली रक्कम आणि त्यावर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेची स्थिती पाहता ही रक्कम अद्यापही ‘जैसे थे’च असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महामंडळाने वसुली मोहीम तीव्र करीत लाभार्थी व लाभार्थींच्या जामीनदारांना नोटिसा काढण्यास सुरुवात केली आहे. परंतु समाजातील मोठा घटक अजूनही मंडळाच्या विविध योजनांपासून वंचित असल्याचे सांगत महामंडळातर्फे कर्जपुरवठ्याच्या योजना अजूनही सुरूच ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार चालू वर्षात विशेष घटक योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानाच्या योजनांमध्ये २७ व बीज भांडवल योजनेंतर्गत ७७ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे, तर ५० टक्के अनुदानाच्या योजनांमध्ये अद्यापही २५४ व बीज भांडवल योजनेतील ४८७ असे एकूण ७४१ प्रकरणे प्रलंबित आहेत.१०४ नव्या प्रकरणांना मंजुरीमहामंडळाच्या कर्जमाफीनंतर अद्यापही ७७० सह १ एप्रिल २०१८ नंतर वितरित करण्यात आलेल्या २ हजार ५५९ खात्यांपैकी ३१ मार्च २०१७ पर्यंत २ हजार ६२६ लाभार्थींकडे कर्जवसुलीची रक्कम थकीत होती. चालू वर्षात यातील केवळ १४ लाख रुपयांची वसुली झाली असताना ५० टक्के अनुदानाच्या योजनांमध्ये २७ व बीज भांडवल योजनेंतर्गत ७७ अशा नव्याने १०४ प्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी