लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात आॅनलाइन पद्धतीने सुमारे २३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. अद्याप २२ हजार अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून, एकूण २४ हजार अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर्षी प्रथमच अकरावीसाठी आॅनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात अर्ज भरले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील प्रवेशप्रक्रियेला येत्या शुक्रवारपासून (दि. १६) प्रारंभ होणार आहे. पुनर्परीक्षार्थींसाठी दुसऱ्या टप्प्यातील भाग दोनच्या अर्जामध्ये शाळेचा सांकेतिक क्रमांकाच्या रकान्यात कुठल्याही प्रकारची खूण करावयाची नाही, अशी सूचना देण्यात आली आहे. शहरातील ५५पेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया यावर्षी राबविली जात आहे. या प्रवेशप्रक्रि येला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
अकरावीसाठी २३ हजार अर्ज
By admin | Updated: June 14, 2017 00:46 IST