शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

लोहोणेर ग्रामपंचायतीवर २१ लाखांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:12 IST

लोहोणेर : ग्रामपंचायतीने गावातील पथिदप संदर्भातील मागील व चालू थकबाकी वीज बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनीने गावातील पथदीप जोडणी तोडल्याने गावातील पथदीप तीन दिवसांपासून बंद असल्याने गावात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे.

ठळक मुद्देपथदिव्यांची थकबाकी वीज पुरवठा खंडीत केल्याने गावावर अंधाराचे साम्राज्य

लोहोणेर : ग्रामपंचायतीने गावातील पथिदप संदर्भातील मागील व चालू थकबाकी वीज बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनीने गावातील पथदीप जोडणी तोडल्याने गावातील पथदीप तीन दिवसांपासून बंद असल्याने गावात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे.ग्रामपंचायतीच्या पथदीप दिवाबत्तीची थकबाकी व चालू बिलाची सुमारे २१ लाख ३१ हजार ११० रूपयांची इतकी मोठी रक्कम थकलेली आहे. सदर थकबाकी संदर्भात महावितरण कंपनीने लोहोणेर ग्रामपंचायतीस कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ थकबाकी सह वीजिबल पाठवून गावातील पथदिपचापुरवठा खंडीत केला आहे. ग्रामपंचायतीकडे याबाबत विचारणा केली असता पथदिप वीजिबल हे आतापर्यत जिल्हा परिषदने परस्पर भरणा केले आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे अद्याप कोणत्याही प्रकारची विचारणा करण्यात आली नाही. ग्रामपंचायतीस बिल आल्यास एवढी मोठी रक्कम दरवेळेस कशी उभी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे . सदर बिल हे आता पर्यत जिल्हा परिषदेच्यावतीने भरणा केले जात होते. मात्र आता शासनाने सदर ग्रामपंचायतीने स्वनिधी अथवा चौदावा वित्त आयोग किंवा इतर उपलब्ध निधीतून सदर भरणा करावा असे परिपत्रक काढले आहे. यासाठीच्या तरतुदी बाबत व लोहोणेर ग्रामपंचायतीस उपलब्ध होणारा शासकीय निधी व संभाव्य येणारे सुमारे एक महिन्याचे लाईट बिल याचा मेळ घालण्यात ग्रामपंचायतीला नाकीनऊ येणार आहे. यामुळे सदर रक्कमेचा भरणा कसा करावा असा प्रश्न सध्यातरी लोहोणेर ग्रामपंचायतीपुढे निर्माण झाला आहे.गावातील स्ट्रीट लाईट ( पथदीप) संदर्भात थकबाकीसह मोठ्या रक्कमेचे बिल महावितरण कंपनीच्यावतीने ग्रामपंचायतीस देण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने लोहोणेर गावातील स्ट्रीट लाईटची जोडणी खंडित करण्यात आली. ही बाब योग्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम कशी भरावयाची असा प्रश्न निर्माण झाला आहे- जयवंता बच्छाव, सरपंच, ग्रामपंचायत लोहोणेरलोहोणेर ग्रामपंचायतीने स्ट्रीट लाईट संदर्भातील बिलाच्या रक्कमेचा भरणा न केल्याने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आलेल्या आदेशानुसार विजजोडणी खंडित करण्यात आली आहे.- एम. एस. चव्हाण, सहाय्यक अभियंता, वीज वितरण कंपनी, उपविभाग लोहोणेरलोहोणेरसह माळवाडी, फुले माळवाडी, सावकी, खामखेडा, पिळकोस, ठेंगोडा आदी ग्रामपंचायतीच्या पथदिपाची जोडणी खंडित करण्याचे आदेश महावितरण कंपनीच्या वतीने देण्यात आले आहेत. सदर ग्रामपंचायतीना भरणा करणे शक्य नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारीशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.- धनश्री आहेर, जि. प. सदस्य लोहोणेर गट