शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गुदामातून २१ बोकड पळविणारा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 01:18 IST

सातपूर भागातील एका मटणविक्री करणाऱ्या दुकानाजवळील गुदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८४ हजार रुपयांचे २१ लहान-मोठे बोकड गायब केल्याची घटना बुधवारी (दि.१७) उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून एका संशयितास बेड्या ठोकल्या आहेत.

ठळक मुद्देमुंब्र्यामधून बांधल्या मुसक्या : बोकडांच्या चोरीसाठी इनोव्हाचा वापर

नाशिक : सातपूर भागातील एका मटणविक्री करणाऱ्या दुकानाजवळील गुदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८४ हजार रुपयांचे २१ लहान-मोठे बोकड गायब केल्याची घटना बुधवारी (दि.१७) उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून एका संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या ताब्यातून या गुन्ह्यातील २१ व अन्य पाच असे एकूण २६ बोकडांची सुटका करत ते पोलिसांनी जप्त केले.याबाबत अधिक माहिती अशी, गुदामाचे कुलूप तोडून चोरट्याने गुदामातील ८४ हजार रुपयांचे २१ बोकड चोरून नेले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.१८) घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी इनोव्हा कारमधून (एम.एच०२बीजे २२४५) बोकड लांबविल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले होते. पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी गुन्हे शाेध पथकाला आदेशित करत गुन्ह्याचा छडा लावण्यास सांगितले.  पोलिसांनी या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत तपास चक्रे फिरविली. पोलिसांनी घोटी येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तेथून मुंबईच्या दिशेने वरील क्रमांकाची कार जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. यामुळे चोरटे मुंबईच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले होते. १ लाख ९ हजार किमतीचा मुद्देमालn पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण शाखेची मदत घेत मोबाइल क्रमांक ट्रेस करत  मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने मुंब्रा गाठले. तेथून संशयित आसिफ रशीदउल्ला कुरेशी (३५, रा. खर्डीरोड, मुंब्रा) यास ताब्यात घेतले. पथकाने आसिफ याची कसून चौकशी केली असता कारमालक ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील असल्याचे समजले. nपोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने सातपूर येथून बोकड चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे १ लाख ९ हजार रुपये किमतीचे २६ बोकडही जप्त केले आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी