शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

२०१५ चा रेडिरेकनर पारदर्शी असावाक्रेडाईची मागणी :

By admin | Updated: August 1, 2014 01:07 IST

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यास दिले निवेदन

नाशिक : २०१४ मध्ये शासनाकडून जाहीर केलेल्या रेडिरेकनर अर्थात बाजारमूल्य तक्त्यात मुंबई, पुण्याच्या तुलनेत ३० ते ६० टक्क्यांनी वाढ केल्याने ग्राहकांना त्यावर मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व त्याच अनुषंगाने सर्व्हिस टॅक्स, व्हॅट, एलबीटी व इन्कम टॅक्सदेखील अधिक भरावा लागत आहे. त्यामुळे शासनाने २०१३ प्रमाणेच २०१५ चा रेडिरेकनर जाहीर करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन क्रेडाईकडून मुद्रांक जिल्हाधिकारी रमेश काळे यांना देण्यात आले.मुंबई, पुण्यामध्ये रेडिरेकनरच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे; परंतु नाशिकमध्ये ही दरवाढ ३० ते ६० टक्के एवढी असल्याने घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. जानेवारी ते जून २०१३ व जानेवारी ते जून २०१४ मधील नोंदणी व उद्दिष्टपूर्तीचा अभ्यास केल्यास दस्त नोंदणी व उद्दिष्टपूर्ती जवळपास ७० टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळते. ही अवाजवी दरवाढ रद्द व्हावी याकरिता मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने सर्वसामान्यांना गृहस्वप्न साकारणे अवघड झाल्याचे, तसेच २०१५ चा बाजारमूल्य तक्ता पारदर्शी व वास्तववादी करण्यासाठी माहिती संकलन व स्थळ निरीक्षण इत्यादि बाबींसाठी क्रेडाई संघटना शासनास मदत करण्यास तयार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर, अविनाश शिरोळे, अभय ताथेड, नरेश कारडा, ताराचंद गुप्ता, शंतनू देशपांडे, सुनील गवादे, प्रशांत पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)